Ramdev Baba: “जेन झीने भारताला बदनाम केलं,” रामदेव बाबांची सीजेपी आंदोलनावर टीका; बडा नेता म्हणाला “महिलांचे कपडे घालून…”
Ramdev Baba: 2011 मधील अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची आठवण करून दिली

Ramdev Baba: नीट पेपरफुटीनंतर दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन करत धर्मेंद्र प्रधान यांच्या केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली. याकरिता मोठ्या संख्येने Gen Z रस्त्यावर उतरले होते. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर 36 दिवसांनंतर सीजेपीचे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र या आंदोलनावरुन Gen Z ने भारताला बदनाम केल्याची टीका योगगुरू रामदेवबाबांनी केली आहे.
रामदेवबाबा काय म्हणाले? (Ramdev Baba)
“गेल्या काही दिवसांपूर्वी जंतरमंतरवर जेन झीने भारताला बदनाम केलं. शिवीगाळ करणं ही आपली संस्कृती नाही. आपण कायम सगळ्यांना आदर देऊन पुढे गेलो आहोत. मोठ्या माणसांचा आदर केला पाहिजे. ज्या काही असहमती असतील त्या संवैधिनिक पद्धतीने चर्चा करुन ठरवल्या पाहिजे. विरोध करायचा असेल तरी तो विवेकपूर्ण विरोध असला पाहिजे. देश रस्त्यावर चालणार नाही, तो संसदेतच चालणार. शिक्षण मंत्री कोण असेल आणि कोण नाही ते रस्त्यावर ठरणार नाही. देशाचे पंतप्रधान आणि देशाची संसद ते ठरवेल,” असे विधान रामदेव बाबा यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले, “काही लोकांनी आझादीचे नारे दिले, ब्राह्मणवादसे आझादी, आरएसएससे आझादी. जर एखाद्या माणसाने ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतला आहे आणि त्याने राष्ट्रवाद संघाकडून शिकला आहे तर तुमच्या का पोटात दुखतं? आपल्या सगळ्यांचे पूर्वज एक आहेत, सगळ्यांचा डीएनए एक आहे. संविधानाने दलित, शोषित वंचितांना जे अधिकार दिलेत तेच अधिकार ब्राह्मणांनाही दिले आहेत. त्यामुळे ब्राह्मणवाद म्हणत शिव्या देणं चुकीचं आहे. सनातन विरोधी लोकांनी आमच्यावर लांछन लावलं आहे, पण तसं मुळीच नाही. उगाच अफवा पसरवल्या जात आहेत.”
रामदेवबाबा यांनी सीजेपीच्या आंदोलनावरून केलेल्या टीकेवर खासदार संजय राऊत यांनी त्यांना 2011 मधील अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची आठवण करून दिली आहे. महिलांचे कपडे घालून सभास्थळावरून पोलीस कारवाईदरम्यान कोणी पळ काढला होता, असा सवाल केला.

Ramdev Baba: “जेन झीने भारताला बदनाम केलं,” रामदेव बाबांची सीजेपी आंदोलनावर टीका; बडा नेता म्हणाला “महिलांचे कपडे घालून…”
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? (Ramdev Baba)
2011 मध्ये लोकपाल बिलासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जंतर मंतरवर मोठे आंदोलन उभारले होते. अण्णा हजारे यांच्यानंतर बाबा रामदेव आणि इतर नेते आंदोलनस्थळी ठाम मांडून बसले होते. त्याची आठवण करून देत राऊतांनी जहरी टीका केली. “आंदोलनास्थळावरून महिलांचे कपडे घालून कोण पळाले हा कोणाचा अपमान होता? तुम्ही पण तेव्हा आंदोलनस्थळी बसले होते ना, मग का बसले होते, ते तर जनतेला सांगा. तुम्ही आंदोलन केले तेव्हा भारताचा अपमान नाही झाला का? जेव्हा काँग्रेसचं, आमचं सरकार देशात येईल, तेव्हा राहुल गांधी यांचा सन्मान करणारे हेच रामदेव बाबा असतील, ते व्यापारी आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी रामदेवबाबांवर केली.
हेही वाचा :





