air travel: ऐन सणासुदीच्या काळात विमानाचा प्रवास महाग
air travel:

air travel: सणासुदीचा काळ, त्यातच पर्यटनाची चाहूल लागलेली असताना वाढलेले विमानभाड्यामुळे पुणेकरांना प्रवासाचे नियोजन बदलावे लागण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे विमानाच्या इंधनाचे दर वाढले आहेत. परिणामी, इंडिगो आणि एअर इंडियासारख्या प्रमुख विमान कंपन्यांनी इंधन अधिभार वाढवला आहे. यामुळे अनेक प्रवाशांनी आपले तिकिट बुकिंग पुढे ढकलले आहे.
पुणे ते बेंगळुरू विमानभाडे ५ ते ६ हजारावरून १० हजारांवर, तर दिल्लीचे तिकीट ११ हजारांच्या घरात गेले आहे. थायलंडचा वन- वे प्रवासही १३ हजारांवरून २५ हजारांवर पोहोचला आहे.
दरम्यान, स्पाईसजेटची पुणे- दुबई सेवा तांत्रिक कारणांमुळे स्थगित झाल्याने प्रवाशांकडे केवळ इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेस हेच पर्याय उरले आहेत. यामुळे तिकीट दर वाढले असून, स्वस्त पर्यायासाठी अनेक पुणेकरांना थेट मुंबई विमानतळावरून दुबईची फ्लाइट पकडावी लागत आहे.
विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चात इंधनाचा वाटा ४० टक्के असतो. पश्चिम आशियातील तणावामुळे हे दर दशकातील सर्वोच्च पातळीवर गेले आहेत. ऐन सणासुदीत वाढलेल्या या दरांमुळे कंपन्यांना भाडेवाढ व सवलतींमध्ये कपात करावी लागेल. केंद्र सरकारची इंधन दर स्थिरीकरण यंत्रणा कंपन्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाची ठरेल.
– धैर्यशील वंडेकर, विमान वाहतूक तज्ज्ञ





