MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! अध्यक्ष भीमनराव सक्तीच्या रजेवर
चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. ११ – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध मागण्यांसाठी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर यश आले आहे.
राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असून, रात्री उशिरा हे आंदोलन तत्त्वतः मागे घेण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी चर्चेनंतर, एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनराव यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे.





