Slight drop in temperature: ढगाळ वातावरणामुळे तापमानात किंचित घट
Slight drop in temperature:

Slight drop in temperature: मागील दहा दिवसांपासून उन्हाच्या चटका वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली असून उकाडाही कमालीचा वाढला आहे. रविवारी (दि. ११) दिवसभर अधून-मधून आलेल्या ढगाळ वातावरणामुळे उन्हाच्या चटक्यांपासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र, हवेतील दमटपणा आणि उकाडा कायम होता.
वडगावशेरी भागात सर्वाधिक ३५.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल बारामती, औंध आणि शिवाजीनगर परिसरात प्रत्येकी ३५.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. चिंचवड येथे ३५.१, हडपसरमध्ये ३४.५, एनडीए ३३.९, मगरपट्टा ३३.५ आणि हवेली येथे ३२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत असला तरी रात्री आणि पहाटेच्या वेळेस हवेत सुखद गारवा निर्माण होत आहे. या बदलत्या वातावरणामुळे पहाटेच्या वेळी जिल्ह्यातील काही तुरळक ठिकाणी हलके धुके पाहायला मिळत आहे.
दिवसभराचा उकाडा आणि पहाटेचा गारवा अशा दुहेरी हवामानाचा अनुभव सध्या नागरिक घेत आहेत. पुढील दोन दिवसात कमाल व किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.





