ZP Election Result 2026: पुण्यात राष्ट्रवादीचा भाजपला ‘दे धक्का’; अजित पवारांच्या पक्षाची जोरदार मुसंडी
ZP Election Result 2026: मावळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश मिळवले

ZP Election Result 2026: पुण्यात अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ही राज्यातील पहिलीच निवडणूक होती. यात पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे. 73 जागांसाठी सुरू असलेल्या या लढतीत राष्ट्रवादीने 36 जागांवर आघाडी घेत आपले वर्चस्व राखले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत निवडणूक लढवल्याचा फायदा होताना दिसत आहे. विशेषतः जुन्नर, आंबेगाव, मावळ आणि खेड या तालुक्यांत राष्ट्रवादीचे पारडे जड राहिले आहे. ZP Election Result 2026
Sharad Pawar: शरद पवार यांची प्रकृती खालावली; बारामतीतून पुण्याच्या दिशेने रवाना
सुनील शेळके भावुक
मावळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश मिळवले आहे. मावळ जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या सर्व 10 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी विजयी झाले. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके अजित पवारांच्या आठवणीत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
पंचायत समितीमध्ये कोणाची आघाडी
जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीच्या 146 जागांचेही निकाल समोर येत आहेत. यात राष्ट्रवादीने 72 जागांवर आघाडी मिळवत जवळपास निम्म्या जागांवर आपला दावा ठोकला आहे. दुसरीकडे, भाजपने 48 जागांवर आघाडी मिळवली आहे.
हेही वाचा:






