Zilla Parishad Election Result 2026 : सोशल मीडियावर बोलबाला पण निवडणुकीत पराभव; निर्मला नवलेंना मतदारांनी नाकारले
Zilla Parishad Election Result 2026 : निर्मला नवले यांचे इन्स्टाग्रामवर 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांनी आयटी इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले आहे.

Zilla Parishad Election Result 2026 : सोशल मिडियावर लोकप्रिय असलेल्या शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचा पराभव झाला आहे. निर्मला यांच्या पतीने त्यांना रेंज रोव्हर कार गिफ्ट केली होती. ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होता. त्यांचे अनेक रिल्स आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले.
याशिवाय त्यांचा मुलाखतीतदरम्यानचा ‘मला जी गोष्ट हवी असते ती हवी असते आणि शुभम मला ती मिळवून देतातच’, हे विधान चांगलेच चर्चेत आले होते. यावरून त्यांना ट्रोलही करण्यात आले होते.
भाजपच्या मनीषा पाचंगे यांच्याकडून निर्मला नवले यांचा पराभव
यानंतर कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गण येथून निवडणुकीला उभ्या होत्या. मात्र, यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांची जादू चालू शकली नाही. भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी निर्मला नवले यांना पराभूत केले.
5 लाखांहून अधिक फॉलोअर्स
पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. निर्मला नवले यांचे इन्स्टाग्रामवर 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. निर्मला नवले यांनी आयटी इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले आहे.
काही वर्षांपूर्वी निर्मला नवले यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. तेव्हापासून त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढत गेली. उच्चशिक्षित आणि लोकप्रिय चेहरा म्हणून निर्मला नवले या कायम चर्चेत असतं. मात्र, यंदाच्या निवडणुकीत निर्मला नवले यांना मतदारांनी नाकारले.
हेही वाचा:
Healthy Relationships: प्रेमाची संकुचित व्याख्या आणि बदलता समाज






