Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आशिया कप 2025 खेळणार की नाही? मोठी अपडेट समोर

Jasprit Bumrah : आशिया चषक 2025 ही क्रिकेटमधील 17 व्या आशिया चषक स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरूवात होणार असून या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबर 2025 या दिवशी खेळवला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या फिटनेसवरून तसेच वर्कलोडच्या बाबतीत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. अखेर याबाबची एक मोठी अपडेट समोर आली आहे.
9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये बुमराह टीम इंडियाचा भाग असणार असल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. तर विंडीजविरुद्धची पहिली कसोटी २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या कसोटी सामन्यात बुमराहला विश्रांती दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. इंग्लंड दौऱ्यावर जसप्रीत बुमराहाने तीन कसोटी सामने खेळले. मात्र, पाचव्या कसोटीत त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यामुळे त्याला सामाना खेळता आला नाही, अशी बातमी समोर आली होती.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ३१ वर्षांच्या जसप्रीत बुमराहला पुरेशी विश्रांती दिली जाणार असल्याची स्पष्ट करण्यात आले आहे. २०२४ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत त्याने आपली उल्लेखनीय कामगिरी केली होती. बीसीसीआयचे अधिकारी बुमराहला पहिल्या कसोटीत विश्रांती देण्याच्या विचारात आहेत.
गरज पडल्यास जसप्रीतला विंडीजविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेतूनच विश्रांती दिली जाईल, अशी देखील माहिती समोर आली आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने निवड समितीकडे सर्व खेळाडूंच्या फिटनेसचा अहवाल सोपविला आहे. यामुळे आता १९ किंवा २० ऑगस्टला आशिया चषक स्पर्धेसाठीचा संघ जाहीर केला जाणार आहे.





