PSL 2025 Title : पठ्ठ्याला मानलं! टॉसच्या १० मिनिटांपूर्वी मैदानात पोहोचला अन् लाहोरच्या जेतेपदाचा हिरो ठरला

Sikandar Raza’s Heroics Lead Lahore Qalandars to PSL Title : झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा याने इंग्लंडमधून लाहोरला अवघ्या १० मिनिटांपूर्वी पोहोचून लाहोर कलंदर्सला पीएसएलचे चार वर्षांतील तिसरे जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. रविवारच्या रोमांचक अंतिम सामन्यात लाहौरने क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात ६ विकेट्सनी शानदार विजय मिळवला.
लाहोर कलंदर्सने तिसऱ्यांदा पटकावले जेतेपद –
या सामन्यापूर्वी सिकंदर रझा नॉटिंघम येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला होता, ज्यात झिम्बाब्वे शनिवारी एका डावाने पराभूत झाला. त्यानंतर त्याने नॉटिंघमहून लाहोरला उड्डाण केले आणि दुसऱ्या दिवशीच लाहौर कलंदर्ससाठी निर्णायक खेळी खेळली. विशेष म्हणजे, नॉटिंघम ते लाहोर हे अंतर ८,८११ किलोमीटर आहे.
Kusal Perera, Real hero of the match🫡🙇🇱🇰#PSL2025 pic.twitter.com/219GFcPRYr
— 𝑨𝙗𝒅𝙪𝒍𝙡𝒂𝙝 𝙎𝒖𝙡𝒕𝙖𝒏⁵⁶ (@Abdullahs_56) May 25, 2025
सिकंदर रझाने ७ चेंडूत चोपल्या निर्णायक २२ धावा –
Bro arrived just 10 minutes before PSL final and won the trophy for Lahore Qalandars. Aura ♾️#PSLFinal #LQvsQG #PSL2025 pic.twitter.com/urUGQ5Ttto
— Talha (@talha10x) May 25, 2025
रविवारी या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना क्वेटाने नऊ बाद २०१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सिकंदर रझाने सात चेंडूत नाबाद २२ धावा केल्या तर कुसल परेराने ३१ चेंडूत नाबाद ६२ धावा केल्या, ज्यामुळे लाहोर कलंदर्स संघाने १९.५ षटकांत ४ बाद २०४ धावा करत पीसएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले. या दरम्यान क्वेटाचा मिस्ट्री स्पिनर अबरार अहमद (१/२७) आणि उस्मान तारिक (१/३८) यांनी मधल्या षटकांमध्ये लाहोरला अडचणीत आणले होते. जेव्हा रझा मैदानावर आला तेव्हा घरच्या संघाला शेवटच्या २० चेंडूत ५७ धावांची आवश्यकता होती.
हेही वाचा – Speedboat Accident : सौरव गांगुलीचा भाऊ आणि वहिनी थोडक्यात बचावले! समुद्रात स्पीडबोट उलटल्याने अपघात
आमिर आणि अशरफची केली धुलाई –
लाहोरला पोहोचण्यासाठी अनेक विमानांनी प्रवास करुण आलेला सिकंदर रझा थकलेला जाणवला नाही. त्याने वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरच्या पहिल्या दोन चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार मारला. फहीम अश्रफच्या शेवटच्या तीन चेंडूंवर संघाला विजयासाठी आठ धावांची आवश्यकता होती. या वेगवान गोलंदाजाविरुद्ध मिड-ऑनवर षटकार आणि नंतर चौकार मारून रझाने लाहोरला संस्मरणीय विजय मिळवून दिला





