“मी आदित्यला मित्र समजत होतो पण…” ; झिशान सिद्दीकी असं का म्हणाले?

Zeeshan Siddique on Aditya। काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर अजित पवार आणि बाबा सिद्धीकी यांचे पुत्र झिशान सिद्धीकी यांच्या भेटीच्या चर्चा सर्वत्र पाहायला मिळतात. त्यामुळे आता झिशानदेखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का ?असा सवाल निर्माण होतोय. मात्र झिशानने या चर्चा फेटाळून लावल्यात.
बाबा सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर पुत्र झिशान यांनी आपण काँग्रेसला सोडणार नाही असे म्हटले. परंतु, त्यांनी महाविकास आघाडीकडून आपल्याला नेहमी सापत्नीक वागणूक मिळते असा आरोप केला. यावेळी त्यांनी खासकरून ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. मी आदित्यला मित्र समजत होतो पण त्याने प्रतिसाद दिला नसल्याचा त्यांनी केला.
हेही वाचा
काँग्रेस का सोडली? दादांचं नेतृत्व स्वीकारणार? विचारताच बाबा सिद्दीकी स्पष्टच बोलले…
“मी त्याला जवळपास ५० वेळा कॉल केले पण…” Zeeshan Siddique on Aditya।
झिशान सिद्दीकी यांनी आदित्य ठाकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. आदित्य ठाकरेंचे वर्तन पाहून मला आश्चर्य वाटायचे. मविआ सरकारच्या पहिल्या वर्षात आदित्य ठाकरे मैत्रीच्या नात्यात प्रो-अॅक्टिव्ह होते. पण त्यानंतर त्यांचा स्वभाव बदलत गेला. नंतरच्या काळात आदित्य पालकमंत्री होता. तरीही माझा किंवा अन्य कोणाचाही फोन आदित्य उचलायचा नाही. मी त्याला जवळपास ५० वेळा कॉल केले पण आदित्य ठाकरेंनी एकदाही माझा फोन उचलला नाही” असे आरोप त्यांनी केले.
हेही वाचा
‘काहीतरी झालं असेल म्हणूनच, मी या कुटुंबातून निघालो….’; राजीनाम्यानंतर बाबा सिद्दीकी यांची पहिली प्रतिक्रिया
पण त्यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मला नसायचे Zeeshan Siddique on Aditya।
पुढे बोलताना झिशान यांनी माझ्या ऑफिसजवळ कार्यक्रम ठेवायचे, पण त्या कार्यक्रमाचं मला निमंत्रण नसायचं. मी त्यांना भेटायचो तेव्हा ही गोष्ट बोलून दाखवायचो. अनेकदा माझ्या वाट्याचा निधीही शिवसेनेच्या दुसऱ्या एखाद्या आमदाराला दिला जात असे. मी त्यावेळी आवाज उठवायचो पण काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते मला साथ द्यायचे नाही. मात्र, त्यावेळी अर्थमंत्री असलेले अजित पवार मला मदत करायचे, असे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले.





