Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील जलसंकटावर ‘वृक्षाधारित शेती’चा उपाय; ‘जलयुक्त शिवार 3.0’ मध्ये समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी रंगमंचावर झालेल्या संवादात सद्गुरूंनी महाराष्ट्राला वारंवार भेडसावणाऱ्या जलसंकटावर दीर्घकालीन उपाय म्हणून वृक्षाधारित शेती सुचवली आहे.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सद्गुरूंना ग्लोबल पीस ऑनर्स 2026 पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी रंगमंचावर झालेल्या संवादात सद्गुरूंनी महाराष्ट्राला वारंवार भेडसावणाऱ्या जलसंकटावर दीर्घकालीन उपाय म्हणून वृक्षाधारित शेती सुचवली आहे. यावर, मुख्यमंत्र्यांनी सद्गुरू व ईशा फाऊंडेशनसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आणि ही पद्धत राज्याच्या जलसंधारण कार्यक्रमात समाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केली.
सद्गुरू म्हणाले, भारत पाण्यासाठी जवळजवळ पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून आहे. धरणांमध्ये पाणी साठवण्यावर भर देण्याऐवजी आता मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्याकडे लक्ष वळवले पाहिजे. नदी म्हणजे मातीतून ओसंडून वाहणारे पाणी. तलावही मातीतूनच ओसंडून भरतो. त्यामुळे पाणी मातीत टिकून राहायचे असेल, तर तिथे वनस्पती असणे आवश्यकच आहे, नाहीतर मुसळधार पाऊस, महापूर आणि त्यानंतर तीन महिन्यांच्या आतच दुष्काळाचा तडाखा, असा उलटा फेरा सुरू राहील, असे ते (Devendra Fadnavis) म्हणाले.
वृक्षाधारित शेतीच्या माध्यमातून शेतजमिनींवर पुन्हा झाडे लावावीत. नेहमीच्या पिकांसोबत झाडे लावली तर शेतकऱ्यांना आपली सध्याची पिके सोडावी न लागता मातीचे आरोग्य, पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न यात लक्षणीय सुधारणा होऊ शकते, असे सद्गुरू म्हणाले. या संवादात तरुणांमधील ताणतणाव, राजकीय नेतृत्व आणि प्रशासन अशा विविध विषयांनाही स्पर्श झाला.
मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही
सद्गुरूंच्या प्रस्तावाला प्रतिसाद देताना मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातील जलसंधारण बळकट करण्याच्या उद्देशाने आखलेल्या जलयुक्त शिवार ३.० कार्यक्रमात राज्य शेतजमिनींवरील वृक्षलागवडीचा समावेश करेल. शेताच्या बांधांवर झाडे लावल्याने मातीचे संवर्धन होईल आणि भूजल पुनर्भरणालाही हातभार लागेल, ही शक्यता त्यांनी मान्य केली.
ईशा फाऊंडेशन आधीपासून राबवत असलेल्या पद्धती शिकून घेण्यासाठी राज्य आपले पथक पाठवेल, असे सांगत त्यांनी सद्गुरूंसोबत काम करण्याची तयारी दर्शवली. आम्हीही तुमच्यासोबत काम करू, कारण तुम्ही केवळ याचा प्रचारच केला नाही, तर ते प्रत्यक्ष आचरणातही आणले आहे; त्यामुळे आधीपासून सुरू असलेल्या सर्व पद्धतींचा लाभ आम्ही घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) दिली.






