‘बिग बॉस’ फेम युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला झाले आई-बाबा

Prince Narula-Yuvika Chaudhary | ‘बिग बॉस 9’ फेम युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला आई-बाबा झाले आहेत. प्रिन्स आणि युविकाच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. युविकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. प्रिन्स आणि युविकाच्या लग्नाच्या सहा वर्षांनंतर ते आई-बाबा झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रिन्सच्या वडीलांनी ही गोड बातमी दिली आहे.
बिग बॉसच्या घरात युविका आणि प्रिन्सच्या मैत्रीला सुरूवात झाली. त्यानंतर ते एकमेंकांना डेट करू लागले. या जोडप्याने 2016 ला साखरपुडा केला आणि 2018 ला ते लग्नबंधनात अडकले. आता त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
काही दिवसांपूर्वीच युविकाचे डोहाळे जेवण पार पडले. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. दरम्यान, प्रिन्स नरुला ‘बिग बॉस 9’ चा विजेता झाला होता. तसेच त्याने ‘रोडीज एक्स 4’ही जिंकले होते.
हेही वाचा:





