Sai Kalyankar : ‘आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात’; ‘कमळी’ फेम अभिनेत्री झाली आई
Sai Kalyankar : काही दिवसांपूर्वी सई कल्याणकरच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटात पार पडला. या कार्यक्रमाला तिच्या 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतील सहकलाकारही उपस्थित होते.

Sai Kalyankar : छोट्या पडद्यावरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील अभिनेत्री सई कल्याणकर आई झाली आहे. तिने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. सईने फोटो शेअर करत ही गुडन्यूज आपल्या चाहत्यांना सांगितली आहे.
सई आणि तिचा नवरा प्रशांतला 10 मार्च 2026 रोजी कन्यारत्न प्राप्त झाली. बाळाच्या जन्माच्या 14 दिवसांनी ही बातमी तिने सगळ्यांना सांगितली. अभिनेत्रीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये सई आणि तिच्या नवऱ्याचा हात दिसत आहे. तसेच चिमुकलीचाही हात दिसत आहे.
अभिनेत्रीने पोस्टला, ‘Born to love, born to shine… आमच्या छोट्या परीचे स्वागत. आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात’, असे कॅप्शन दिले आहे. सईची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर सेलिब्रिटी, नेटकरी तसेच चाहत्यांनी कमेंट करुन सईचे कौतुक केले आहे. Sai Kalyankar :
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी सईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटात पार पडला. या कार्यक्रमाला तिच्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील सहकलाकारही उपस्थित होते. या डोहाळे जेवणाचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले.
अभिनेत्री सई कल्याणकरने अनेक मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘दख्खनचा राजा जोतिबा’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ यांसह अनेक मालिकेत ती झळकली.
गरोदरपणाच्या आधी ती ‘कमळी’ या झी मराठीवरील मालिकेत काम करत होती मात्र नंतर तिला प्रसूतीसाठी सुट्टी घ्यावी लागली. यातील तिच्या पात्राला प्रेक्षकांची देखील मोठी पसंती मिळाली.
हेही वाचा:





