Dinesh Karthik Baby : दिनेश कार्तिकच्या घरी अवतरली ‘परी’! दोन जुळ्या मुलांनंतर पत्नी दीपिकाने दिला मुलीला जन्म; पाहा काय ठेवलंय नाव?
Dinesh Karthik Baby : कार्तिकने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक भावूक पोस्ट शेअर करत मुलीच्या जन्माची माहिती दिली.

Dinesh Karthik Baby Girl Raha : टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिक आणि ‘स्क्वॉश क्वीन’ दीपिका पल्लीकल यांच्या आयुष्यात तिसऱ्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कार्तिकने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक भावूक पोस्ट शेअर करत मुलीच्या जन्माची माहिती दिली.
यापूर्वी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी या जोडीला कबीर आणि जियान ही दोन जुळी मुले झाली होती. आता त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या मुलीचा प्रवेश झाला असून कार्तिकने तिचे नाव ‘राहा’ (Raha Pallikal Karthik) ठेवल्याचे जाहीर केले आहे.
“कबीर आणि जियान बहिणीच्या भेटीसाठी उत्सुक” Dinesh Karthik Baby
View this post on Instagram
कार्तिकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “आमच्या हृदयात आशीर्वादाची भावना आणि शब्दांत व्यक्त करता न येणारी कृतज्ञता घेऊन आम्ही आमच्या लाडक्या लेकीचे स्वागत करतो. कबीर आणि जियान आपल्या छोट्या बहिणीला भेटण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.” कार्तिकच्या या पोस्टवर क्रीडा विश्वातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा – IPL 2026 Key Players : IPL 2026 चा ‘मॅच विनर’ कोण? धोनीच्या ताफ्यात संजूची एन्ट्री तर RCB मध्ये अय्यरचा जलवा; पाहा १० संघांचे शिलेदार!
दीपिकाची साथ लाभल्याने धक्क्यातून सावरला कार्तिक – Dinesh Karthik Baby
View this post on Instagram
दिनेश कार्तिकचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे राहिले आहे. पहिल्या पत्नीने दिलेला धोका आणि जवळच्या मित्रानेच (मुरली विजय) केलेला विश्वासघात यामुळे कार्तिक पूर्णपणे खचला होता. मात्र, अशा कठीण परिस्थितीत दीपिका पल्लीकल त्याच्या आयुष्यात आली. २०१५ मध्ये या दोघांनी विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याची सुरुवात केली. तेव्हापासून दीपिकाने कार्तिकला मैदानावर आणि वैयक्तिक आयुष्यातही खंबीर साथ दिली आहे.





