Nagar | एमआयडीसीच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळेल

नगर, (प्रतिनिधी) – शहरात दिवाळीनंतर विविध भागात रस्ता कॉंक्रिटीकरणाची कामे मार्गी लागणार आहे. दहा वर्षांमध्ये केलेली विकास कामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम होत आहे. नगर एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी ६०० एकर जागा उपलब्ध झाली असून, या ठिकाणी मोठ-मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
एमआयडीसी मधील आमी संघटनेच्या वतीने विधानसभा निवडणुकीमध्ये आ. जगताप यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयदार्य खाकाळ, उपाध्यक्ष महेश इंदानी, अरविंद पारगावकर, सुनील मुनोत, सुमित लोढा, सागर निंबाळकर, राजेंद्र कटारिया, दिलीप अकोलकर,
राजेंद्र सुक्रे, नरेंद्र बाफना, गौरव गंधे, अमित पानसरे, सतीश गवळी, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, हरजीतसिंह वधवा, सुमित सोनवणे, निनाद टिपूगडे, मिलिंद कुलकर्णी, दौलतराव शिंदे, दिलीप कर्नावट, अनिल लोढा, किरण कातोरे, रवी बक्षी, सुभाष गुगळे, अदीसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते
अरविंद पारगावकर म्हणाले की, शहरामध्ये सुरू असलेल्या विकास कामामुळे आम्ही सर्व उद्योजक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शहराला महानगराचे रूप देण्यासाठी तुम्ही काम करत आहात. नगर एमआयडीसीमध्ये एक मोठा उद्योग आणावा, जेणेकरून या ठिकाणी १० हजार युवकांना रोजगार मिळेल.
त्या माध्यमातून शहराच्या अर्थकारणाला बळ मिळेल. उद्योजकांच्या काही समस्या असतात त्या सोडविण्याचे काम तुम्ही करतच आहात, नगरमध्ये आता उद्योग येण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू असे ते म्हणाले.
१९ वर्ष ओसाड पडलेल्या जागेत आयटी पार्क सुरु केले
एमआयडीसीतील आयटी इमारत 2000 साली माजी उद्योग मंत्री कै. पतंगराव कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. तेव्हापासून 19 वर्ष बिल्डिंग ओसाड पडली होती. आता या आयटी पार्कमध्ये तीनशे युवक युवती काम करत आहेत.
ते काम बंद पाडण्यासाठी काही स्वयंघोषित लोक पुढे येत आहे. प्रत्येक जण शून्यातूनच काम सुरू करत असतात मधल्या काळात आयटी पार्क क्षेत्रावर कोविडचे मोठे संकट ओढावले होते. आजही काही लोक वर्क फॉर्म होम काम करत असून, या ठिकाणी एक चांगला मोठा प्रकल्प आणायचा प्रयत्न असल्याचे आ. संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.





