Nagar | बोल्हेगाव परिसरात लालदिव्याच्या गाडीचा फोटो बॅनरवर झळकले

नगर, (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास सुरवात झाली आहे. महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी शहरातील दोन भागांमध्ये प्रचाराचा झपाटा लावला आहे. शहरातील बोल्हेगाव व नागापूर या उपनगर परिसरात झालेल्या प्रचार फेऱ्यांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्यने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी नागापूर येथील श्री चक्रधर स्वामी मंदिराचे महंत शाम महाराज यांचे आशीर्वाद घेतल्यावर ज्येष्ठ उद्योजक लिंबाशेट नागरगोजे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचार फेरीला प्रारंभ केला. यावेळी आ.संग्राम जगताप यांना विजयाच्या हॅटट्रिकच्या शुभेच्छा देत लालदिव्याच्या गाडीचा फोटो बॅनरवर झळकावण्यात आला होता.
ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या प्रचारचे परिसारत ठिकठिकाणी स्वागत करून नागरीकांनी आ.संग्राम जगताप यांचा सत्कार तसेच महिलांनी औक्षण केले.
आ.संग्राम जगताप यांनी या परिसरात मोठ्याप्रमाणात विकास कामे करून रस्ते, पाणी, पथदिवे, आरोग्य या मुलभूत गरजा पूर्ण केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी क्रेनच्या सहाय्याने मोठा पुष्पहार घालून आ.संग्राम जगताप यांचा सत्कार केला.
नागापूरकरांच्या या उत्स्फूर्त स्वागत सत्काराने आ.संग्राम जगताप भारावले. यावेळी आ.संग्राम जगताप यांना विजयाच्या हॅटट्रिकच्या शुभेच्छा देत लालदिव्याच्या गाडीचा फोटो बॅनरवर झळकावण्यात आला होता.
यावेळी माजी नगरसेवक अॅड. राजेश कातोरे, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, माजी सरपंच दत्ता सप्रे, माजी नगरसेवक डॉ.सागर बोरुडे व दत्तात्रय सप्रे, हनुमंतराव कातोरे, साहेबराव सप्रे, ज्ञानदेव सप्रे, अॅड.गणेश कातोरे, राणी भाकरे, वैशाली राजहंस, कांचन इंगवले, सुखदेव मते, राजेश सिंग, जॉन भाकरे आदींसह परिसरातील नागतिक, महिला, युवक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
अॅड. राजेश कातोरे यांनी आ.संग्राम जगताप यांनी गेल्या ५ वर्षात नागापूर परिसरात कोट्यवधी रुपयांच्या विकास निधीतून मोठ्याप्रमाणात विकास कामे केल्याने परिसराचा कायापालट झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने नागापूर साठी फेज टू योजने अंतर्गत स्वतंत्र पाण्याची टाकीचे काम झाले आहे.
काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेज कमान ते डॉक्टर आंबेडकर चौक रस्ता कॉंक्रिटीकरण, पितळे कॉलनी परिसरातील संपूर्ण रस्त्यांच्या कामास मंजुरी, नागापूर गावठाण अंतर्गत सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम मंजूर, ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीला संरक्षण भिंत बांधण्याचे काम पूर्णत्वाकडे,
आदर्शनगर येथील श्रीराम मंदिराच्या सभामंडपाचे काम पूर्ण, नागापूर हनुमान मंदिराच्या सभा मंडपास मंजूरी, क्रीडांगणाच्या संरक्षित भिंतीचे काम पूर्ण याशिवाय अनेक कामे मंजूर असून प्रगतीपथावर आहेत.
यावेळी दीपक कातोरे, राहुल कातोरे, आकाश बारस्कर, प्रल्हाद कातोरे, नवनाथ कातोरे, सिमोन भाकरे, सुरेश भिंगारदिवे, राजू शेख, उज्वला वाघ, अनिता भोसले, डॉक्टर ठोंबरे, सुभाष लवांडे, नवनाथ पवार, कालेकर, अनंत कुमार दुबे, पप्पू काळे, लक्ष्मण काळे, किशोर भोर, बजरंग काळे, योगेश कातोरे, संतोष कातोरे, सौरभ कातोरे, लक्ष्मण कातोरे , लहानु भाऊ भोर, राधा पाटोळे, अनुसया भाकरे, बाळासाहेब जगदाळे, पंकज वाकळे आदी उपस्थित होते.





