Nagar | सारसनगरची वाटचाल आदर्श नगरच्या दिशेने : आ.संग्राम जगताप

नगर, (प्रतिनिधी) – एकेकाळी कोणत्याच सुविधा नसलेल्या सारसनगरचा आता सर्वांगीण विकास झाला आहे. जेथे चांगल्या सुविधा मिळतात तेथेच नगरीकांना रहावयास आवडते. त्यामुळे चांगल्या सोयीसुविधा मिळत असल्याने या भागात झपाट्याने लोकवस्ती वाढत आहे.
सारसनगर मधील रस्ते, पाणी, पथदिवे, आरोग्य या मुलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबरच या भागात आता नगर मधील पहिले सर्व सोयीसुविधांयुक्त स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे.
तसेच उद्यान, सर्व समाजांसाठी सभामंडप, ९० टक्के अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, सुशोभीकरण आदी विकास कामांमुळे सारसनगरची वाटचाल आता आदर्श नगरकडे झाली आहे. येथील नागरिकांना सर्वोत्तम नागरी सुविधा मिळत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. शहरातील विविध भागांमध्ये आ.संग्राम जगताप यांनी प्रचारास सुरवात केली असून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सारसनगर मध्ये झालेल्या प्रचार फेरीस परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आ.संग्राम जगताप यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे व संजय चोपडा, डॉ.विजय भंडारी, ज्ञानदेव पांडूळे, दत्ता खैरे, ज्ञानेश्वर रासकर, प्रा.विधाते, छबुराव कांडेकर, बापूसाहेब ओव्हाळ, विष्णु कलागते,
लकी खूबचंदानी, महादेव कारळे, दादा दरेकर, धर्मा कारंडे, बाबासाहेब भगत, राजू ससाणे, देशमुख सर, समीर खडके, अशोक म्हस्के, शरदराव भांबरे, दिपक गांधी, कांतीलाल गांधी, पंकज मेहर, प्रकाश ईवळे, अरुण गाडळकर, झुंबरराव आव्हाड, बबन घुले, अनिल पालवे, आलिशा गर्जे, किरण कटारिया आदींसह मोठ्या संख्यने नागरिक,महिला उपस्थित होत्या.
महात्मा फुले चौका पासून सुरु झालेली ही प्रचारफेरी त्रिमूर्ती चौक, सारस कॉलनी, सचिन नगर, राधाकृष्ण मंदिर, शिवगंगा टॉवर, कपिलेश्वर कॉलनी, राजश्री कॉलनी, भगवानबाबा चौक, मधुबन कॉलनी, राजमाता कॉलनी, चिपाडे मळा, नानाजीनगर आदी भागांमध्ये झाली. यावेळी ठिकठिकाणी उमेदवार संग्राम जगताप यांचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले तसेच महिलांनी औक्षण केले.
यावेळी प्रकाश भागानगरे यांनी प्रास्ताविकात आ.संग्राम जगताप यांनी सारसनगरच्या विकासासाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला. ते म्हणाले, आ.संग्राम जगताप यांनी काही वर्षातच सारसनगरचा कायापालट केला आहे.
त्यामुळे हा परिसरातील जवळपास सर्व प्रश्न व समस्या मार्गी लागल्या आहेत. आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सारसनगर परिसरात अरुणोदय स्पोर्ट कॉम्प्लेक्स हे आधुनिक क्रीडा संकुल पूर्णत्वास येत असून यासाठी ११ कोटी रुपये निधी दिला आहे. स्वामी समर्थ केंद्रासाठी सुमारे २५ लक्ष रुपयांचे सभामंडप दिला आहे.
जैनस्थानकाच्या सभामंडपासाठीही २५ लक्ष रुपये निधी दिला. सारसनगरच्या प्रवेशद्वारावर भव्य स्वागत कमान उभारली असून त्याचे नामकरण क्रांतिजोती सावित्रीबाई फुलेनगर असे करण्यात आले आहे.
महात्मा फुले चौका जवळ सारसनगरला जाणाऱ्या रस्त्यावर व नानाजीनगरला नवीन पूल भांधाण्यात आला आहे. प्रभागातील ९० टक्के रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण झाले आहे. मधुबन कॉलनीत वाचनालय, राजमाता कॉलनी येथे नवीन आरोग्य केंद्र, त्रिमूर्ती चौक येथे नवीन आरोग्य उपकेंद्र, अनेक ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड तसेच पेव्हिंग ब्लॉक बसवून सुशोभित करण्यात आले आहेत.





