Pune Crime News : पुण्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून; गोकुळनगर परिसरातील घटना
Pune Crime News : पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात हत्येची एक थरारक घटना उघडकीस आली आहे.

Pune Crime News : मद्यप्राशन केल्यानंतर झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याची घटना गोकुळनगर परिसरात घडली. राजकुमार संगोडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तुषार वाल्हेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)
गोकुळनगर येथील एअरकिंग हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली. राजकुमार संगोडे आणि तुषार वाल्हेकर हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे असून, ते नेहमी सोबत असायचे. कालदेखील दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. (Pune Crime News)
घटनेच्या वेळी दोघांनी मद्यप्राशन केले होते. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. यावेळी तुषारने राजकुमारच्या डोक्यात दगडाने वार केले. गंभीर जखमी झालेल्या राजकुमारचा घटनास्थळीच मृत्यू झाला. (Pune Crime News)
घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी तुषार वाल्हेकर याला ताब्यात घेतले असून, खुनामागील नेमके कारण आणि वादाचे स्वरूप याबाबत अधिक तपास सुरू आहे. (Pune Crime News)
Pune Crime News: रक्ताचे डाग धुवून कॅफे पुन्हा सुरू; पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मालकासह दोघांना अटक





