Maharashtra Politics : मोठी घडामोड..! भाजपचा ‘हा’ माजी आमदार बंडखोरीच्या तयारीत; राज्यात खळबळ
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर पक्षातील अंतर्गत बंडाळी उघड झाली आहे.

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. या जागेसाठी इच्छुक असलेले माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी ५ ऑक्टोबर रोजी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics)
कोहळे आणि सोले यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे आणि अनिल सोले हे भाजपमधील प्रमुख इच्छुक होते. उमेदवारीचा निर्णय होण्यापूर्वी दोन्ही नेत्यांकडून मतदारसंघात तयारी सुरू होती. अखेर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने ४ ऑक्टोबरला सुधाकर कोहळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. (Maharashtra Politics)
यापूर्वीच्या निवडणुकीतही भाजपने अनिल सोले यांच्या ऐवजी संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. यावेळी पुन्हा उमेदवारी न मिळाल्यानंतर सोले यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. सोले हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय आणि सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी नागपूरचे महापौरपदही भूषवले आहे. (Maharashtra Politics)
कोहळेंची मुख्यमंत्र्यांची भेट
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधाकर कोहळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी उमेदवारीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या भेटीच्या पार्श्वभूमीवर अनिल सोले यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षात प्रयत्न होणार का, याकडे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
‘सोले माझे गुरू, त्यांची नाराजी नाही’ : सुधाकर कोहळे
उमेदवारीनंतर प्रतिक्रिया देताना सुधाकर कोहळे यांनी अनिल सोले हे आपले गुरू असल्याचे सांगितले. गेल्या काही वर्षांत पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्याचे सांगत कोहळे यांनी सोले यांची नाराजी नसल्याचे म्हटले आहे. तसेच पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्ते एकत्र काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Maharashtra Politics)

काँग्रेसकडून अभिजित वंजारी
दरम्यान, काँग्रेसने नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यातील लढतीसोबतच अनिल सोले स्वतंत्रपणे रिंगणात उतरतात का, याकडेही लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. मतदान २३ ऑक्टोबर रोजी, तर मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. (Maharashtra Politics)





