Pune District : पानशेत कालव्यात पोहताना सांगलीतील तरुणाचा बुडून मृत्यू
Pune District : या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये तानाजी भोसले, गणेश सपकाळ, निलेश तारू, वैभव भोसले आणि आकाश जोरी यांनी सहभाग घेतला. तसेच वेल्हे पोलीस स्टेशनचे आकाश पाटील, बनकर साहेब आणि होमगार्ड धरपळे यांनीही मदत केली.

वेल्हे : पानशेत कालव्यात पोहण्यासाठी आलेल्या सांगली जिल्ह्यातील तरुणाचा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. अमित दीपक चव्हाण (वय अंदाजे २८, रा. तासगाव, जि. सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे.
अमित हा मित्रांसोबत पानशेत कालव्यावर पोहण्यासाठी आला होता. खोल पाण्यात गेल्याने तो बुडाला. घटनेची माहिती त्याचा मित्र पवन याने तातडीने ११२ क्रमांकावर दिली. माहिती मिळताच शेवते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस स्टेशनचे कर्मचारी व होमगार्ड घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक व रेस्क्यू टीमने शोधमोहीम राबवत तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये तानाजी भोसले, गणेश सपकाळ, निलेश तारू, वैभव भोसले आणि आकाश जोरी यांनी सहभाग घेतला. तसेच वेल्हे पोलीस स्टेशनचे आकाश पाटील, बनकर साहेब आणि होमगार्ड धरपळे यांनीही मदत केली.





