“होय मी पकिस्तानी आहे, भाजपवाल्यांना काय करायचे ते करावे”

कॉंग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचे सरकारला आव्हान
नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू झालेला वाद हा काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे. कारण एकीकडे देशात या कायद्याला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. तर दुसऱ्या स्तरावर याचे राजकारणी वापर करून घेत असल्याचे दिसत आहे. अशातच होय, मी पाकिस्तानी आहे. भाजपाला जे करायचंय ते त्यांनी करावं. तुम्हाला कोणी घाबरत नाही. दिल्लीमध्ये बसलेले रंगा-बिल्ला काहीही बोलतील आणि सर्वांना ते मान्य करावे लागेल. नाही केलं तर त्यांना देशद्रोही म्हटले जाईल असे सध्या सुरु आहे,असा शब्दांमध्ये कॉंग्रेसचे नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
Had #DavindarSingh by default been Davindar khan ,the reaction of troll regiment of RSS would have been more strident and vociferous. Enemies of our country ought to be condemned irrespective of Colour, Creed, and Religion.
(1/3)— Adhir Chowdhury (@adhirrcinc) January 14, 2020
केंद्राने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) विरोध करताना चौधरी यांनी कोलकात्यामध्ये भाजपाला लक्ष्य केले. पश्चिम बंगालमधील परगनामधील बशीरहाट येथील एका सभेला संबोधित करताना चौधरी यांनी एक भाषण दिले. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेस सीएए आणि एनआरसीला विरोध करत राहील असेही चौधरी यांनी स्पष्ट केले. भारत देश हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची खासगी मालमत्ता नाही,असा टोलाही चौधरी यांनी आपल्या भाषणामध्ये लगावला. मी पाकिस्तानी आहे असे अनेकदा म्हटले जाते. आज मी उघडपणे सांगतो की मी पाकिस्तानी आहे. तुम्हाला काय करायचे आहे ते करा, असेही चौधरी यांनी आपल्या भाषणात म्हटले.
The chink in the armour is exposed in the valley much to the consternation of us,we can not afford ourselves to be penny wise and pound foolish,
(2/3)#DavindarSingh— Adhir Chowdhury (@adhirrcinc) January 14, 2020
जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथे हिजबूल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांसोबत जम्मू काश्मीरचे पोलीस उपअधिक्षक देवेंद्र सिंह यांना अटक झाल्यानंतर पुलवामा हल्ल्याची पुन्हा चौकशी करण्याची मागणी चौधरी यांनी केली होती. चौधरी यांनी 14 जानेवारी रोजी केलेल्या ट्विटमध्ये पुलवामा हल्ल्यामध्ये देवेंद्र सिंहचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला होता. चौधरी यांनी 14 जानेवारी रोजी तीन ट्विट केले होते. देवेंद्र सिंहऐवजी देवेंद्र खान असता तर आरएसएसच्या ट्रोलर्स जास्त सक्रीय दिसले असते. रंग, पंथ आणि धर्माचा भेदभाद न करता देशाच्या शत्रूचा विरोध केला पाहिजे. आता पुन्हा पुलवामा हल्ला कोणी घडवून आणला याबद्दलचे प्रश्न उपस्थित केले जातील. या हल्ल्याची नव्याचे चौकशी व्हायला हवी, असे चौधरी यांनी म्हटले होते.
चौधरी यांच्या याच टीकेवरुन भाजपाने कॉंग्रेस या प्रकरणाला वेगळे वळण देऊ पाहत असल्याचा आरोप केला होता. भारताच्या भूमीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभागाला कमी महत्व देण्यासारखे हे वक्तव्य असल्याची टीका भाजपाने केली होती.





