Temple Roof Collapse : महाराष्ट्र हादरला..! हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळून 7 जणांचा मृत्यू; परिसरात हाहाकार
Temple Roof Collapse : मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराच्या सभा मंडपाचे छत अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.

Temple Roof Collapse : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात शनिवारी भीषण दुर्घटना घडली. मंदिराचा सभा मंडप अचानक कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 32 जण जखमी झाले आहेत.मंडपाखाली 30 ते 40 भाविक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून अधिकृत आकडेवारीत बदल होण्याची शक्यता आहे. (Temple Roof Collapse)
भाविकांमध्ये एकच आरडाओरडा (Temple Roof Collapse)
शनिवार असल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. त्याचवेळी सभा मंडप अचानक कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. मलब्याखाली अनेक भाविक अडकल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. (Temple Roof Collapse)
बचावकार्य युद्धपातळीवर (Temple Roof Collapse)
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाची पथके घटनास्थळी दाखल झाली. अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही सर्व संबंधित यंत्रणांना तातडीने घटनास्थळी पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Temple Roof Collapse)
सभा मंडप कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक टप्प्यात बचावकार्याला प्राधान्य देण्यात आले असून, त्यानंतर दुर्घटनेच्या कारणांची चौकशी केली जाणार आहे. या दुर्घटनेमुळे यशवाडी परिसरात शोककळा पसरली असून भाविकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी आणि रुग्णालयांकडे धाव घेतली आहे. (Temple Roof Collapse)
दरम्यान, या दुर्घटनेबद्दल खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जखमींना तातडीने सर्वोत्तम उपचार मिळावेत तसेच प्रशासनाने सर्वतोपरी मदतकार्य राबवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Temple Roof Collapse)
Parbhani : मारुती मंदिराचा सभामंडप कोसळला, चौघांचा मृत्यू, 27 भाविक जखमी





