Parbhani : मारुती मंदिराचा सभामंडप कोसळला, चौघांचा मृत्यू, 27 भाविक जखमी
Parbhani: काही भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

Parbhani : मानवत तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र यशवाडी देवस्थान येथे शनिवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. मारुती मंदिरासमोरील सभामंडपाचे बांधकाम सुरू असताना पिलर आणि छत अचानक कोसळल्याने 27 भाविक जखमी झाले असून 4 भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. (Parbhani)
शनिवार असल्याने देवस्थानात दर्शन, कीर्तन आणि महाप्रसादासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती. सभामंडपात शेकडो भाविक उपस्थित असतानाच दुपारी अचानक छत कोसळले. मोठा आवाज होताच परिसरात पळापळ सुरू झाली. अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Parbhani : मारुती मंदिराचा सभामंडप कोसळला, 30 भाविक जखमी
घटनेची माहिती मिळताच मानवत पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ढिगाऱ्याखालून अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून जखमींना रुग्णवाहिकांद्वारे विविध रुग्णालयांत दाखल करण्यात येत आहे. (Parbhani)
दरम्यान, या दुर्घटनेबद्दल खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जखमींना तातडीने सर्वोत्तम उपचार मिळावेत तसेच प्रशासनाने सर्वतोपरी मदतकार्य राबवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Parbhani)
या दुर्घटनेमुळे यशवाडी परिसरात शोककळा पसरली असून भाविकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी आणि रुग्णालयांकडे धाव घेतली आहे. ( Parbhani)





