IND vs ENG : यशस्वी जैस्वालचे ऐतिहासिक शतक! हेडिंग्लेवर ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय

📸 📸
A celebratory run 👌
The hands aloft 🙌
The trademark jump ☺️
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @ybj_19 pic.twitter.com/E4PDGDOKEb
— BCCI (@BCCI) June 20, 2025
इंग्लंडमधील पहिल्या कसोटी डावात भारतासाठी शतक झळकावणारे खेळाडू –
- १४६ मुरली विजय – ट्रेंट ब्रिज २०१४
- १३३ विजय मांजरेकर – हेडिंग्ले १९५२
- १३१ सौरव गांगुली – लॉर्ड्स १९९६
- १२९* संदीप पाटील – ओल्ड ट्रॅफर्ड १९८२
- १००* यशस्वी जैस्वाल- हेडिंग्ले २०२५
हेही वाचा – IND vs ENG : साई सुदर्शनच्या नावावर लज्जास्पद विक्रमाची नोंद, ‘ही’ नकोशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
यशस्वीला अनेक वेळा लागला चेंडू –
यशस्वी जैस्वाल जखमी झाल्यानंतरही क्रीजवरच राहिला. इंग्लंडच्या गोलंदाजांचा चेंडू त्याच्या शरीरावर अनेक वेळा आदळला. त्यानंतरही यशस्वीने हार मानली नाही. तो क्रीजवरच राहिला. शतकापूर्वी फिजिओ दोनदा मैदानावर आला. त्याने यशस्वीची तपासणी केली. त्याच्या दोन्ही हातात समस्या होत्या. त्याच्या हातावर बर्फाचा पॅक लावण्यात आला होता.
हेही वाचा – IND vs ENG : साई सुदर्शनने केली इतिहासाची पुनरावृत्ती, ३८ वर्षांनंतर टीम इंडियामध्ये पुन्हा ‘असं’ घडलं
चहापानापर्यंत भारताची धावसंख्या २ बाद २१५ धावा –
यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुबमन गिल यांच्या भागीदारीमुळे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचे दुसरे सत्र पूर्णपणे भारताच्या बाजूने होते. लंच ब्रेकच्या अगदी आधी भारताने दोन विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या सत्रात गिल यशस्वीला साथ देण्यासाठी मैदानात आला. गिल आणि यशस्वी यांनी या सत्रात इंग्लंडला कोणतेही यश मिळू दिले नाही, ज्यामुळे चहापानापर्यंत भारताने दोन विकेट्स गमावून २१५ धावा केल्या.





