ICC World Test Championship Points Table 2023-25 : जागतिक क्रिकेट मध्ये रविवार (28 जानेवारी) हा कसोटी क्रिकेटसाठी अतिशय मनोरंजक दिवस होता. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. हैदराबादमध्ये झालेल्या रोमहर्षक लढतीत इंग्लंडने भारताचा 28 धावांनी पराभव केला. याआधी दुसरीकडे वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. ब्रिस्बेन कसोटीत वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. अत्यंत रोमांचक झालेल्या या कसोटीत कॅरेबियन संघाने 8 धावांनी विजय मिळवला. 1997 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकण्यात विडींजला यश आले. त्याचवेळी इंग्लंडने भारताला हरवून आश्चर्यचकित केले. AUS vs WI 2nd Test : ‘शेमर जोसेफ’समोर कांगारू फलंदाजांची शरणागती; विडींजने तब्बल 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात जिंकली कसोटी… इंग्लंडविरूध्दच्या या पराभवानंतर भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 गुण तालिकेत आता पाचव्या स्थानावर आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवानंतरही ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. आॅस्ट्रेलियाने 10 सामन्यांत सहा जिंकले आहेत तर तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 55 टक्के गुण आहेत. त्याच वेळी, भारताची टक्केवारी आता 43.33 वर घसरला आहे. भारताने पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. IND vs ENG 1st Test : पहिल्या कसोटीत इंग्लंडचा धक्कादायक विजय! जाणून घ्या, टीम इंडियाच्या पराभवाची 5 मोठी कारणे… बांगलादेश भारताच्या पुढे…. ऑस्ट्रेलियाशिवाय दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेश आता पॉइंट टेबलमध्ये भारतापेक्षा पुढे आहेत. या तिन्ही संघांची गुणांची टक्केवारी 50-50 आहे. सध्याच्या कसोटी चॅम्पियनशिप सायकलमधील भारताचा हा दुसरा पराभव आहे. आफ्रिकन संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.