WTC Final 2025 : मिचेल स्टार्कने रचला इतिहास! डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मोडला शमीचा विक्रम

आयसीसीच्या अंतिम सामन्यात स्टार्क ठरला सर्वात यशस्वी गोलंदाज –
या दोन विकेट्ससह, मिचेल स्टार्कने एक उत्तम कामगिरी केली आहे. तो आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. दोन विकेट्ससह, त्याने आयसीसीच्या अंतिम सामन्यात त्याच्या विकेट्सची संख्या ११ वर नेली आहे. स्टार्कने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी दोन एकदिवसीय विश्वचषक, एक टी-२० विश्वचषक आणि दोन डब्ल्यूटीसी फायनल खेळले आहेत.
A PERFECT 10-YEAR CHALLENGE CREATED BY STARC! A FIRST OVER WICKET IN THE ICC FINALS 🙌
It was McCullum in 2015… it’s Markram in 2025! 🔁#WTCFinal #AUSvsSA #MitchellStarc pic.twitter.com/oDAcUvijEh
— OneCricket (@OneCricketApp) June 11, 2025
२०१५ च्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये त्याने २० धावा देत २ विकेट्स, २०२३ च्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये त्याने ५५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर २०२१ मध्ये दुबई येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषक फायनलमध्ये स्टार्कने एक विकेट्स घेतली होती. तसेच २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये स्टार्कने भारताविरुद्ध दोन्ही डावात प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या होत्या.
मिचेल स्टार्कने मोहम्मद शमीला टाकले मागे –
मिचेल स्टार्कने भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मागे टाकले आहे. आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात शमीने १० विकेट्स घेतल्या आहेत. शमीने दोन डब्ल्यूटीसी फायनल, एक एकदिवसीय विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये भाग घेतला आहे आणि एकूण १० विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी त्याने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ८ विकेट्स घेतल्या आहेत, तर २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक आणि २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.





