Mohammed Shami Ranji : न्यूझीलंड दौऱ्यातून डावलल्यानंतर मोहम्मद शमीने घेतला सर्वात मोठा निर्णय! नेमकं काय केलं? पाहा
Mohammed Shami Ranji : भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडलेल्या एकदिवसीय आणि कसोटी संघातून वगळण्यात आल्यामुळे मोहम्मद शमी बंगालच्या दुसऱ्या सामन्यात खेळत नाहीये. त्याच्या जागी त्याचा भाऊ कैफची निवड झाली आहे.

Mohammed Shami Sits Out Ranji Trophy Match After New Zealand Tour Snub : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या बऱ्याच काळापासून राष्ट्रीय संघाबाहेर असून, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने विकेट्स मिळवूनही त्याला डावलले जात आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यावरील वनडे आणि टेस्ट संघात शमीला पुन्हा एकदा स्थान देण्यात आले नाही. या अनपेक्षित निर्णयानंतर शमीने तीव्र नाराजी व्यक्त करत थेट रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यातून माघार घेतली आहे. बंगालकडून खेळताना पहिल्या सामन्यात चार विकेट्स घेणाऱ्या शमीने दिल्लीतील पालम स्टेडियमवर सुरू असलेल्या सर्व्हिसेसविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून स्वतःहून बाहेर राहणे पसंत केले.
दुखापत नसतानाही सामन्यातून माघार; भावाची संघात एन्ट्री –
शमी पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. तरीही न्यूझीलंड दौऱ्यात नाव न दिसल्याने निराश होऊन त्याने हा सामना न खेळण्याचा कठोर निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. पहिल्या सामन्यात त्याने दिल्लीविरुद्ध यश धुल आणि हृतिक शोकीनसह चार फलंदाजांना तंबूत धाडले होते. आता सर्व्हिसेसविरुद्धच्या लढतीत शमीच्या अनुपस्थितीत त्याचा धाकटा भाऊ मोहम्मद कैफ याला बंगालच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे.
भुवीच्या पुनरागमनानंतर आशा पल्लवित; पण पदरी निराशा –
Veteran Indian fast bowler Mohammed Shami was a notable omission from Bengal’s playing XI for their second-round Ranji Trophy match against Services at the Palam Ground in Delhi. The 36-year-old pacer opted out of the match shortly after being overlooked by the BCCI selection committee for India’s all-format tour of New Zealand.
Shami had recently delivered a strong performance in Bengal’s season opener against Delhi in Kalyani, taking 4 for 30 in the first innings. Despite his solid domestic showing, selectors opted for alternative pace options for the national team. In his absence, Shami’s younger brother, Mohammad Kaif, was named in Bengal’s playing XI to lead the seam attack alongside Suraj Sindhu Jaiswal.
#MohammedShami #RanjiTrophy #TeamIndia #INDvsNZ
— The Daily Jagran (@TheDailyJagran) October 18, 2026
चार वर्षांनंतर भुवनेश्वर कुमारचे भारतीय संघात पुनरागमन झाल्याने आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पद सोडल्यामुळे शमीच्या पुनरागमनाच्या चर्चांनी जोर धरला होता. शमीलाही राष्ट्रीय संघात पुनरागमनाची पूर्ण खात्री होती, मात्र निवड समितीने युवा गोलंदाजांना प्राधान्य देत शमीला पुन्हा बाहेर ठेवले. याशिवाय मुकेश कुमार आणि आकाश दीप यांची न्यूझीलंडविरुद्धच्या इंडिया ए संघात निवड झाल्याने तेही या रणजी सामन्यात खेळत नसून, २४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी ते लवकरच न्यूझीलंडला रवाना होणार आहेत.
भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा २२ ऑक्टोबरपासून –
भारतीय संघ २२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यात पाच टी-२०, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना २२ ऑक्टोबरला क्राइस्टचर्च येथे रंगणार आहे. या संपूर्ण दौऱ्यासाठी निवड समितीने युवा वेगवान गोलंदाजांवर भर दिला असून, सातत्याने डावलले जात असल्याने शमीचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील भवितव्य आता गंभीर संकटात सापडले आहे.





