Kaif Slams Selectors : शमीवर अन्याय का? बीसीसीआयने खरं कारण समोर येऊन सांगाव; मोहम्मद कैफ निवड समितीवर संतापला
Kaif Slams Selectors : मोहम्मद कैफने मोहम्मद शमीला संघातून वगळण्यामागील बीसीसीआयच्या तर्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Mohammad Kaif Questions BCCI and Selectors Over Mohammed Shami Omission From New Zealand Tour : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुनरागमनासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत असतानाही निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि कसोटी दौऱ्यातून शमीला पुन्हा एकदा डावलण्यात आल्यानंतर त्याच्या आंतरराष्ट्रीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशात भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून बीसीसीआय आणि निवड समितीने लपवाछपवी न करता शमीला बाहेर ठेवण्याचे खरे कारण जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.
पारदर्शकता हवी; कैफने निवड समितीला धरले धारेवर –
क्रिकबझशी बोलताना मोहम्मद कैफने शमीच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा दाखला दिला. शमीने मागील रणजी हंगामात बंगालकडून तब्बल ३७ विकेट्स घेतल्या होत्या, ज्यामध्ये तीन वेळा डावात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी समाविष्ट होती. कैफ म्हणाला की, “माझे स्पष्ट मत आहे की संघ निवडीत पूर्ण पारदर्शकता असायला हवी. निवड समितीने समोर येऊन सांगावे की नेमकी अडचण काय आहे. शमी सर्व गोष्टी योग्य करत आहे, रणजी खेळतोय, विकेट्स मिळवतोय, मग त्याला वगळण्यामागे नक्की काय कारण असू शकते?”
बुमराहही लहान स्पेल टाकतो; फिटनेसचे कारण फेटाळले –
शमीच्या फिटनेसवर आणि तो लहान स्पेल टाकत असल्याच्या चर्चांवरून कैफने संताप व्यक्त केला. त्याने जसप्रीत बुमराहचे उदाहरण देत विचारले की, “मी कुठेतरी वाचले की शमी लहान स्पेल टाकत असल्याने त्याची निवड होत नाही. पण कसोटी सामन्यांमध्ये खुद्द जसप्रीत बुमराहसुद्धा बहुतांश वेळा लहान-लहान स्पेलमध्येच गोलंदाजी करतो आणि त्यानंतर त्याला विश्रांती दिली जाते. इंग्लंड दौऱ्यावर बुमराहचा वर्कलोड सांभाळताना शुबमन गिललाही त्याच्याकडून लहान स्पेलच करून घ्यावे लागत होते; मग शमीबाबतच असा दुजाभाव का?”
WHY NO BHUVI AND SHAMI IN INDIA TEAM? – MOHAMMAD KAIF QUESTIONS INDIA’S SELECTORS 👀 [CRICBUZZ]
Mohammad Kaif said 🗣️,
“When it comes to age, you bring it up for Virat Kohli, for Rohit Sharma, and for Mohammed Shami. Why bring up age? Age does not define you; your current form and your fitness do. Mohammed Shami is bowling 20-over spells in first-class cricket—what more can a person do? Bhuvneshwar Kumar recently played IPL for Bangalore twice and helped win it both times—what more can a player do?
So, I believe this is India’s loss. If you don’t give an opportunity to such players and don’t pick them, here is how I see it: the quality Bhuvneshwar Kumar and Mohammed Shami have will take these new players a very long time to reach. Since you spoke about experience, experience is lacking in fast bowling, and that is where work needs to be done.
My belief is that if you want to win the World Cup, you must have experienced bowlers. There won’t be an issue with batting—we always keep circling back to Rohit Sharma, Virat Kohli, Rohit Sharma, Virat Kohli; our discussion never moves past them, and that remains the only talking point.
However, if you want to win the World Cup, you will have to sort out the bowling. When you talk about the all-rounders at numbers 6, 7, and 8, who will be there? The top 5 or 6 spots are already set: you have Shreyas Iyer, Virat Kohli, Rohit Sharma, KL Rahul as keeper—that’s all set up to number 6 without an issue, and Hardik Pandya will come in.
The real issue comes after that: which spinners will play? Who will be the fast bowlers? Will you back the newcomers? We played newcomers recently at Lord’s—England scored 387, and Jasprit Bumrah didn’t play there. Without Bumrah, we took quite a beating. Arshdeep Singh was there, I think Harpreet Brar was there, and several other new players got a chance. But my belief is that you won’t be able to make them mature or fully seasoned within just one year.”— Cricket Central (@CricketCentrl) September 18, 2026
न्यूझीलंडच्या फलंदाजांना विचारा, ते शमीलाच घाबरतात –
न्यूझीलंडविरुद्ध शमीची आकडेवारी किती घातक आहे, याची आठवण कैफने करून दिली. तो म्हणाला की, “तुम्ही जाऊन थेट न्यूझीलंडच्या फलंदाजांना विचारा की त्यांना कोणत्या गोलंदाजाचा सामना करायला सर्वात जास्त भीती वाटते? ते सर्वात पहिले नाव मोहम्मद शमीचेच घेतील. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात धर्मशाला येथील साखळी सामन्यात आणि वानखेडेवरील उपांत्य फेरीत शमीने एकहाती भारताला न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.”
आगरकरांचा कार्यकाळ आणि शमीची कसोटी संघातून अनिश्चितता –
Mohammad Kaif On Shami’s Exclusion-💔🇮🇳 https://t.co/ymh80BIyJj
— Shanawaz Hussain (@shanawazhusain0) October 18, 2026
शमीच्या फिटनेसबाबत माजी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये साशंकता व्यक्त केली होती. तर मे २०२६ मध्ये आगरकरांनी शमीचे शरीर केवळ टी-२० क्रिकेटसाठी योग्य असल्याचे सांगत कसोटी निवडीवर चर्चाच झाली नसल्याचे नमूद केले होते. मात्र शमीने रणजी सामन्यांमध्ये बंगालकडून खेळून स्वतःची लाल चेंडूवरील तंदुरुस्ती वारंवार सिद्ध केली आहे. तरीही त्याला न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर ठेवल्याने निवडकर्त्यांच्या हेतूवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





