WPL Auction 2025 : धारावीची सिमरन ठरली सर्वात महागडी खेळाडू, लागली इतक्या कोटींची बोली..

WPL 2025 Auction Highlights :– महिला प्रीमियर लीग 2025चा (डब्लूपीएल) मिनी लिलाव रविवारी संपला आहे. या लिलावात 19 खेळाडूंचे नशीब चमकले आणि वेगवेगळ्या फ्रँचायझींनी खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली लावली आणि त्यांना आपल्या संघात समाविष्ट केले. या लिलावात आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावतील सिमरन शेखचे नशिब उजळले. कारण, युवा खेळाडू सिमरनला गुजरात जायंट्सने तब्बल 1.90 कोटींची बोली लावून आपल्या संघात समाविष्ट केले.
Here are the 𝗧𝗼𝗽 𝗕𝘂𝘆𝘀 after an exciting Auction day 😇#TATAWPL pic.twitter.com/FsxTYAAP0R
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) December 15, 2024
सिमरनने आपले बालपण धारावीत घालवताना अभ्यास सोडून क्रिकेटची करिअर म्हणून निवड केली. गुजरातने सिमरनला मूळ किमतीपेक्षा 19 पट अधिक किमतीत विकत घेतले आहे. महिला प्रीमियर लीग लिलावात दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायजीने सर्वप्रथन सिमसनवर पहिली बोली लावली. दिल्लीने 10 लाख रुपयांची बोली लावली. ही सिमरनची मूळ किंमत होती. यानंतर गुजरात जायंट्स या बोलीत सामील झाले. दिल्लीने शेवटची 1.80 कोटींची बोली लावली, पण गुजरातने 1.90 कोटींची बोली लावून सिमरनला संघात समाविष्ट केले. अशाप्रकारे, सिमरनला मूळ किमतीपेक्षा 19 पट अधिक किमतीत खरेदी करण्यात आले.
दहावीनंतर अभ्यास सोडला…
सिमरनचे वडील जाहिद अली यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, “सिमरनला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. ती जेव्हा खेळायची तेव्हा बरेच लोक तिला टोमणे मारायचे, पण सिमरनने सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिमरनने 10वीनंतर अभ्यास सोडला होता.
सिमरनची कारकिर्द…
सिमरन ही मधल्या फळीतील फलंदाज आहे. गेल्या मोसमात त्याला एकही खरेदीदार मिळाला नाही. तिने डब्लूपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले आहेत. या काळात तिला 7 डावात फलंदाजीची संधी मिळाली, त्यात ती काही विशेष करू शकली नाही. सिमरन महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्स महिला संघाकडून खेळली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती मुंबईकडून खेळते.
बोली न लागलेल्या अव्वल खेळाडू…
स्नेह राणा – भारत
हीदर नाइट – इंग्लंड
लॉरा हॅरिस – ऑस्ट्रेलिया
लॉरेन बेल – इंग्लंड
हुमैरा काझी – भारत
WPL 2025 लिलाव : लिलावात निवड केलेल्या 19 खेळाडूंची यादी…
डिआंड्रा डॉटिन- गुजरात जायंट्स- 1.70 कोटी रूपये
नादिन डी क्लर्क- मुंबई इंडियन्स- 30 लाख रूपये
जी कमलिनी- मुंबई इंडियन्स- 1.60 कोटी रूपये
सिमरन शेख- गुजरात जायंट्स- 1.90 कोटी रूपये
नंदिनी कश्यप- दिल्ली कॅपिटल्स- 10 लाख रूपये
प्रेमा रावत- राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- 1.20 कोटी रूपये
एन चारनानी- दिल्ली कॅपिटल्स- 55 लाख रूपये
आरुषी गोयल- यूपी वॉरियर्स- 10 लाख रूपये
क्रांती गौर- यूपी वॉरियर्स- 10 लाख रूपये
SMAT 2024 (Final) : सूर्यांश-सूर्याची दमदार कामगिरी, मुंबईने MP चा पराभव करत पटकावलं विजेतेपद…
संस्कृती गुप्ता- मुंबई इंडियन्स- 10 लाख रूपये
जोशिता व्हीजे- राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- 10 लाख रूपये
सारा ब्राइस- दिल्ली कॅपिटल्स- 10 लाख रूपये
अलाना किंग- यूपी वॉरियर्स- 30 लाख रूपये
राघवी बिस्त- राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- 10 लाख रूपये
जागर्वी पवार- राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- 10 लाख रूपये
निक्की प्रसाद- दिल्ली कॅपिटल्स 10 लाख रूपये
अक्षिता माहेश्वरी- मुंबई इंडियन्स- 20 लाख रूपये
डॅनियल गिब्सन- गुजरात जायंट्स- 30 लाख रूपये





