Mumbai Indians : मुंबई इंडियन्सची रिटेंशन लिस्ट जाहीर! कर्णधारासह ‘या’ पाच खेळाडूंना केले रिटेन

Mumbai Indians retained players for WPL 2026 : महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) २०२६ साठी २७ नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यापूर्वी सर्व फ्रेंचायझींनी आपली रिटेंशन लिस्ट जाहीर केली आहे. दोन वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सनेही आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. एमआयने कर्णधार हरमनप्रीत कौरसह एकूण ५ खेळाडूंना कायम ठेवले आहे. मुंबईने डब्ल्यूपीएल २०२५ चे विजेतेपद दिल्ली कॅपिटल्सला हरवून पटकावले होते.
मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले ५ खेळाडू कोणते?
मुंबई इंडियन्सने डब्ल्यूपीएल २०२६ साठी ५ खेळाडूंना रिटेन केले आहे. यात कर्णधार हरमनप्रीत कौर (२.५ कोटी रुपये), विदेशी स्टार नॅट सायव्हर-ब्रंट (३.५ कोटी रुपये), हेली मॅथ्यूज (१.७५ कोटी रुपये), ऑलराऊंडर अमनजोत कौर (१ कोटी रुपये) आणि अनकॅप्ड खेळाडू जी. कमलिनी (५० लाख रुपये) यांचा समावेश आहे. हे पाचही खेळाडू डब्ल्यूपीएल २०२६ मध्ये एमआयच्या संघाकडून खेळताना दिसतील.
Mumbai, पाहा आपले 𝐑𝐞𝐭𝐚𝐢𝐧𝐞𝐝 stars! 🤩#AaliRe #MumbaiIndians #TATAWPL pic.twitter.com/tXnmFD0L8m
— Mumbai Indians (@mipaltan) November 6, 2025
डब्ल्यूपीएल रिटेंशन नियम –
डब्ल्यूपीएलच्या रिटेंशन नियमांनुसार, प्रत्येक संघ जास्तीत जास्त तीन कॅप्ड भारतीय खेळाडू, दोन विदेशी खेळाडू आणि दोन अनकॅप्ड भारतीय खेळाडूंना रिटेन करू शकतो. मात्र, जर एखादी फ्रेंचायझी ५ खेळाडूंना रिटेन करू इच्छित असेल, तर त्यात किमान एक अनकॅप्ड भारतीय खेळाडू असणे अनिवार्य आहे. याशिवाय, डब्ल्यूपीएल २०२६ मध्ये राइट टू मॅच (आरटीएम) पर्यायही उपलब्ध असेल, ज्यामुळे लिलावादरम्यान पूर्व खेळाडूंना परत खरेदी करता येईल. मुंबईने ५ खेळाडूंना रिटेन केल्याने त्यांच्याकडे आरटीएम पर्याय उपलब्ध राहणार नाही.
एमआयकडे लिलावासाठी शिल्लक पर्स –
डब्ल्यूपीएलने लिलावासाठी १५ कोटी रुपये पर्स निश्चित केली आहे आणि रिटेंशनसाठी वेगवेगळे वेतन स्लॅब ठरवले आहेत. पहिल्या खेळाडूसाठी ३.५ कोटी रुपये, दुसऱ्यासाठी २.५ कोटी रुपये, तिसऱ्यासाठी १.७५ कोटी रुपये आणि चौथ्यासाठी १ कोटी रुपये. पाचव्या खेळाडूसाठी रिटेंशन ५० लाख रुपये आहे. ५ खेळाडू रिटेन केल्यास १५ कोटींच्या पर्समधून एकूण ९.२५ कोटी रुपये वजा होतील. चार खेळाडूंसाठी ८.७५ कोटी, तीनसाठी ७.७५ कोटी, दोनसाठी ६ कोटी आणि एकासाठी ३.५ कोटी रुपये वजा होतील. त्यामुळे एमआयकडे लिलावासाठी फक्त ५.७५ कोटी रुपये शिल्लक आहेत.
हेही वाचा – 1xBet Betting Case : रैना-धवन यांची ११ कोटींची मालमत्ता जप्त; 1xBet सट्टेबाजी प्रकरणात ईडीची मोठी कारवाई!
मुंबई इंडियन्सच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी (पैशानुसार) –
- हरमनप्रीत कौर – २.५ कोटी रुपये
- नॅट सायव्हर-ब्रंट – ३.५ कोटी रुपये
- अमनजोत कौर – १ कोटी रुपये
- हेली मॅथ्यूज – १.७५ कोटी रुपये
- जी. कमलिनी – ५० लाख रुपये
- शिल्लक पर्स – ५.७५ कोटी रुपये





