WPL 2025 Final MI vs DC : हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने उभारली सन्मानजनक धावसंख्या, दिल्लीसमोर ठेवले ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य

WPL 2025 Final MI vs DC Updates : डब्ल्यूपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आहेत. या सामन्यात हरमनप्रीत कौर आणि नॅट सिव्हर ब्रंट यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे मुंबईने दिल्लीसमोर १५० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. जेतेपदाच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर, मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकांत सात गडी गमावून १४९ धावा केल्या. दिल्लीकडून मॅरिझॅन कॅप, जेस जोनासन आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर अॅनाबेल सदरलँडने एक विकेट घेतली.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. नताली सिव्हर ब्रंट आणि हरमनप्रीत कौर वगळता त्यांचा कोणताही फलंदाज दिल्लीच्या घातक गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. संघाने १४ धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. मॅरिझॅन कॅपने हेली मॅथ्यूज (३) आणि यास्तिका भाटिया (८) यांच्या विकेट घेतल्या. यानंतर, ब्रंट आणि कर्णधार कौर यांनी जबाबदारी स्वीकारली.
ब्रंट-कौरच्या भागीदारीने मुंबईला सन्मानजनक धावसंख्यपर्यंत पोहोचवले –
Acceleration from the Mumbai Indians 📈
5⃣0⃣-run partnership up between captain Harmanpreet Kaur and Nat Sciver-Brunt👍#MI 66/2 after 11 overs.
Updates ▶ https://t.co/2dFmlnwxVj #TATAWPL | #DCvMI | #Final pic.twitter.com/U2AdhNh6TD
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2025
या दोघींमध्ये ६२ चेंडूत ८९ धावांची भागीदारी झाली. नल्लापुरेड्डी चरणीने नॅट सिव्हर ब्रंटला मिन्नू मनीच्या हाती झेलबाद केले. ती ३० धावा करून बाद झाली. त्याच वेळी, कर्णधार हरमनप्रीत कौरन ४४ चेंडूत ६६ धावा केल्या. त्यांच्याशिवाय, अमेलिया कर डो, जी कमलिनी यांनी १०, अमनजोत कौर यांनी १४ आणि संस्कृती गुप्ताने ८ धावांवर नाबाद परतल्या. सजीवन सजना खातेही उघडू शकली नाही.
नॅट सिव्हर ब्रंटने इतिहास रचला –
नॅट सिव्हर ब्रंट ही डब्लूयपीएलच्या इतिहासात एकाच हंगामात ५०० धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली खेळाडू ठरला आहे. तिने डब्लूयपीएल २०२५ मध्ये एकूण ५२३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे. यापूर्वी हा विक्रम आरसीबीच्या एलिस पेरीच्या नावावर होता, जिने डब्लूयपीएल २०२४ मध्ये ३४७ धावा केल्या होत्या. या हंगामात ५२३ धावा करण्यासोबतच, ब्रंटने अंतिम सामन्यापूर्वी ९ विकेटही घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत, ती स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड होण्याची सर्वात मोठी दावेदार असल्याचे दिसून येते.





