WPL 2025 Final MI vs DC : मुंबई आणि दिल्लीमध्ये रंगणार आज जेतेपदाचा सामना, जाणून घ्या दोन्ही संघांची ‘हेड टू हेड’ आकडेवारी

WPL 2025 Final Match MI vs DC : महिला प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम फेरीत आता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने येणार आहे. हा जेतेपदाचा सामना १५ मार्च रोजी मुंबईच्या ब्रेब्रॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांतील हा सामना खूपच रोमांचक होणार आहे. मुंबई संघाने यापूर्वी एकदा अंतिम सामना जिंकला आहे, पण दिल्ली यावेळी जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी दोन्ही संघांची हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊया.
मुंबई विरुद्ध दिल्ली हेड टू हेड रेकॉर्ड –
𝙏𝙝𝙚𝙮 𝙈𝙚𝙚𝙩 𝘼𝙜𝙖𝙞𝙣….𝙄𝙣 𝙏𝙝𝙚 𝙁𝙞𝙣𝙖𝙡 😍
Delhi Capitals 🆚 Mumbai Indians
🗓 Saturday, March 15, 2025
⏰ 8.00 PM IST
🏟 Brabourne Stadium, Mumbai#TATAWPL | #DCvMI | #Final | @DelhiCapitals | @mipaltan pic.twitter.com/e2fyj21ViB— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 13, 2025
खरं तर, आकडेवारीवरून असे दिसून येते की महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सचा वरचष्मा राहिला आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये अंतिम फेरीचा सामना झाला होता. त्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ७ विकेट्सने पराभव केला होता. यानंतर, दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या हंगामाच्या अंतिम फेरीत पोहोचले. पण यावेळी स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा ८ विकेट्सने पराभव केला.
One is going for a maiden #TATAWPL title 🏆
The other for a record 2️⃣nd trophy in the cabinet 🏆🏆
🎥 🔽 The captains hype us up for the big finale 🤩 #DCvMI | #Final | @DelhiCapitals | @mipaltan pic.twitter.com/T3S4xQB7b5
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2025
मात्र, आता दिल्ली कॅपिटल्सने सलग तिसऱ्यांदा हंगामात अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे ते आपली पहिली ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करतील.आतापर्यंत दोन्ही संघात एकूण सात सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी चार सामन्यात दिल्लीने तर तीन सामन्यात मुंबईने बाजी मारली आहे.
आता प्रश्न असा आहे की, दिल्ली कॅपिटल्स अंतिम सामन्यातील त्यांची पराभवाची मालिका खंडीच करु शकेल का? हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा महिला प्रीमियर लीग विजेता बनेल का? तथापि, या हंगामात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स दोनदा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने दोन्ही वेळा मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे.





