WPL 2025 Auction : लिलावात ‘या’ 5 खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, जाणून घ्या, कोणत्या संघाने कोणाला अन् किती किंमतीत केले खरेदी…

WPL 2025 Auction : महिला प्रीमियर लीग 2025 (WPL 2025) साठीचा लिलाव काल (15 डिसेंबर) पार पडला. गेल्या महिन्यात आयपीएल 2025 साठी लिलावही झाला होता. जिथे अनेक खेळाडूंवर 20 कोटींहून अधिक किमतीची बोली लावण्यात आली. त्याच वेळी, यावेळी महिला प्रीमियर लीगमध्ये 19 खेळाडूंची केवळ 9.5 कोटी रुपयांना विक्री झाली. या लिलावाच्या समाप्तीनंतर, 5 संघ WPL 2025 साठी तयार झाले आहेत.
मिनी लिलावात एकूण 19 स्लॉट होते. या कालावधीत 124 खेळाडू विक्रीसाठी उपलब्ध होते . याआधी सर्व संघांनी आपले मोठे खेळाडू कायम ठेवले होते. या कारणास्तव, लिलावात कोणावरही मोठी बोली लावण्यात आली नाही. संपूर्ण लिलावात फक्त चार खेळाडू होते ज्यांच्यावर 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली लावली गेली. सिमरन शेख, जी कमलिनी आणि प्रेमा रावत यांच्याशिवाय या यादीत वेस्ट इंडिजची डायंड्रा डॉटिन हीचा समावेश आहे.
सिमरन शेख ठरली सर्वात महागडी खेळाडू…
सिमरन WPL 2025 च्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. तिला गुजरात जायंट्सने 1.9 कोटी रुपयांना विकत घेतले. तिची मूळ किंमत 10 लाख रुपये होती. तिला विकत घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि जायंट्स यांच्यात स्पर्धा होती.
लिलावात 1 कोटी 70 लाख रुपयांच्या बोलीसह वेस्ट इंडिजची डिआंड्रा डॉटन ही दुसरी सर्वात महागडी खेळाडू ठरली. ती आता गुजरात संघात सामील झाली आहे. डायंड्राला खरेदी करण्यासाठी गुजरात आणि यूपी वॉरियर्समध्ये स्पर्धा होती.
तिसरी सर्वात महागडी खेळाडू जी कमलिनी होती. कमलिनी आजपर्यंत भारताकडून खेळलेली नाही. प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी करून तिला भारतीय संघात स्थान मिळवायचे आहे. मुंबईने तिला 1.60 कोटींना विकत घेतले.
आरसीबीने 1.20 कोटी रुपये देऊन प्रेमा रावतचा संघात समावेश केला. अनेक संघांचीही नजर प्रेमावर होती. पण शेवटी आरसीबीनं बाजी मारली. हे चार खेळाडू लिलावातील सर्वात महागडे खेळाडू ठरले. याशिवाय एन चरणानीला दिल्ली कॅपिटल्सने 55 लाख रुपयांना विकत घेतले. याशिवाय, सर्व खेळाडूंना त्यांची मूळ किंमत 30 लाख किंवा 10 लाख रुपयांना खरेदी करण्यात आले आहे.
Here are the 𝗧𝗼𝗽 𝗕𝘂𝘆𝘀 after an exciting Auction day 😇#TATAWPL pic.twitter.com/FsxTYAAP0R
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) December 15, 2024
WPL 2025 लिलाव : लिलावात Sold झालेल्या 19 खेळाडूंची यादी…
सिमरन शेख- गुजरात जायंट्स- 1.90 कोटी रूपये
डिआंड्रा डॉटिन- गुजरात जायंट्स- 1.70 कोटी रूपये
जी कमलिनी- मुंबई इंडियन्स- 1.60 कोटी रूपये
प्रेमा रावत- राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- 1.20 कोटी रूपये
एन चारनानी- दिल्ली कॅपिटल्स- 55 लाख रूपये
नादिन डी क्लर्क- मुंबई इंडियन्स- 30 लाख रूपये
अलाना किंग- यूपी वॉरियर्स- 30 लाख रूपये
डॅनियल गिब्सन- गुजरात जायंट्स- 30 लाख रूपये
अक्षिता माहेश्वरी- मुंबई इंडियन्स- 20 लाख रूपये
WPL Auction 2025 : धारावीची सिमरन ठरली सर्वात महागडी खेळाडू, लागली इतक्या कोटींची बोली..
नंदिनी कश्यप- दिल्ली कॅपिटल्स- 10 लाख रूपये
आरुषी गोयल- यूपी वॉरियर्स- 10 लाख रूपये
क्रांती गौर- यूपी वॉरियर्स- 10 लाख रूपये
संस्कृती गुप्ता- मुंबई इंडियन्स- 10 लाख रूपये
जोशिता व्हीजे- राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- 10 लाख रूपये
सारा ब्राइस- दिल्ली कॅपिटल्स- 10 लाख रूपये
राघवी बिस्त- राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- 10 लाख रूपये
जागर्वी पवार- राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- 10 लाख रूपये
निक्की प्रसाद- दिल्ली कॅपिटल्स 10 लाख रूपये





