WPL 2024 : चॅम्पियन आरसीबीवर पडला पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…

Womens Premier League 2024 Prize Money : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने महिला प्रीमियर लीग 2024 (WPL 2024) चे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून आरसीबीने पहिल्यादाच विजेतेपद पटकावले. बंगळुरूसाठी अंतिम सामना खूपच सोपा होता, कारण त्यांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीला केवळ 113 धावांवर रोखले आणि 19.3 षटकांत दोन गडी गमावून सहज हे लक्ष्य गाठले.
चला तर मग जाणून घेऊया की, चॅम्पियन आरसीबीला किती बक्षीस रक्कम मिळाली आणि दिल्ली कॅपिटल्स हरूनही करोडपती कशी झाली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सत्रात चॅम्पियन ठरलेल्या संघासाठी 6 कोटी रुपये आणि उपविजेत्या संघासाठी 3 कोटी रुपये बक्षीस रक्कम निश्चित केली होती. दुसऱ्या सत्रात म्हणजेच 2024 मध्ये या बक्षीस रकमेत कोणताही बदल झालेला नाही.
अशा परिस्थितीत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला बक्षीस रक्कम म्हणून 6 कोटी रुपये आणि उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला 3 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. पहिल्या सत्रात जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सलाही सहा कोटी रुपये मिळाले. पहिल्या सत्राप्रमाणेच दिल्लीचा संघ दुसऱ्यांदाही उपविजेता राहिला. दोन्ही हंगामात दिल्ली जेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर राहिली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ranji-trophy-2024-prize-money-money-rains-on-champion-mumbai-know-how-much-prize-money-was-received/
दुसऱ्या सत्रातच पटकावले विजेतेपद…
दरम्यान, RCB महिला संघाने विजेतेपद जिंकून उत्कृष्ट कामगिरी केली, कारण बेंगळुरू पुरुष संघ गेल्या 16 वर्षात किंवा 16 हंगामात एकही विजेतेपद जिंकू शकला नाही. प्रत्येक मोसमात, चाहत्यांना अपेक्षा असते की यावेळी पुरुष संघ ट्रॉफी जिंकेल, परंतु आतापर्यंत तसे झाले नाही. त्याचवेळी आरसीबी महिला संघाने अवघ्या दुसऱ्या सत्रात विजेतेपद पटकावले.





