यावेळी त्यांनी संघासाठी २ कोटी रुपयांच्या रोख बक्षीसाची (Cash Prize) घोषणा केली. हे बक्षीस खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्यात वितरित केले जाणार आहे. “या विजयाने जम्मू-काश्मीरच्या क्रीडा क्षेत्रातील सुवर्णकाळाची सुरुवात झाली आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
\n\n\nJ&K’s finest hour has arrived! Emotions surging beyond words as I watch our Cricket team claiming the Ranji Trophy. To every fierce player who carved history through sheer grit: thank you from entire UT beaming with pride. You have immortalized history—embrace it with honor.
\n— Office of LG J&K (@OfficeOfLGJandK) February 28, 2026
\nजम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही एक्सवर पोस्ट करत संघाचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, “जम्मू-काश्मीरचा सर्वोत्तम काळ आता आला आहे. आपल्या क्रिकेट संघाने रणजी चषक जिंकल्याचा आनंद शब्दांच्या पलीकडे आहे. ज्या खेळाडूंनी आपल्या हिंमतीच्या जोरावर इतिहास रचला, त्या प्रत्येकाचे आणि संपूर्ण राज्याचे मी अभिनंदन करतो.”