WPL 2024 : माझ्या कामगिरीत अजून सुधारणा हवी – मेग लॅनिंग

Women’s Premier League 2024 :- दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग ही आतापर्यंतच्या महिला प्रीमियर लीगमधील सर्वात प्रभावी फलंदाजांपैकी एक आहे. परंतु तिला अजूनही वाटते की तिला पुढे जाण्यासाठी तिच्या खेळात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. दोन अर्धशतकांच्या मदतीने चार डावांत १४८ धावा करणारी लॅनिंग सध्या स्पर्धेतील तिसरी सर्वाधिक धावा कररी फलंदाज आहे.
डीसीच्या शेवटच्या सामन्यात, लॅनिंगने ४१ चेंडूत ५५ धावा करत गुजरात जायंट्सवर २५ धावांनी विजय मिळवला. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर मंगळवारी होणाऱ्या त्यांच्या पुढील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे.
लॅनिंग म्हणाली की, भारतातले प्रेक्षक खेळाच्या बाबतीत खूपच जाणकार असल्याने मला खरखुरं क्रिकेट खेळण्याचा आनंद इथेच मिळतो. मी संघाच्या विजयात थोडेसे का होईना योगदान देऊ शकते याचा मला नेहमीच आनंद वाटतो. तरिही मला असे वाटते की मी जशी खेळत आहे त्यामध्ये अजून थोडी सुधारणा करणे आवश्यक आहे. मी पूर्णपणे समाधानी नाही, परंतु मी म्हटल्याप्रमाणे मी फक्त प्रयत्न करत आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/vadodara-police-seize-rs-1-crore-from-former-womens-cricket-coach-tushar-arothe/
अगदी याच पद्धतीचे विधान काही वर्षांपूर्वी स्टीव्ह वाॅ याने केले होते. कोणत्याही सामन्यासाठी मैदानावर जाताना, मी कायम असे लक्षात ठेवतो की, हा माझा पहिलाच सामना आहे आणि मी नीट नाही खेळलो, तर कदाचित पुढच्या सामन्यात मी संघात नसेन, असे स्टीव्ह वाॅ म्हणाला होता.





