WPL 2024 ( #MIvRCB #Eliminator ) | पेरीचे झंझावाती अर्धशतक; आरसीबीचे मुंबईसमोर ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य…

WPL Live Cricket Score, MI vs RCB, Eliminator 2024 : आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर RCB आणि मुंबई इंडियन्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना खेळला जात आहे. मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 षटकांत सहा गडी गमावून 135 धावा केल्या आहेत. आता हरमनप्रीत कौरच्या संघासमोर विजयासाठी 136 धावांचे लक्ष्य आहे. एलिस पेरीने आरसीबीसाठी 50 चेंडूत सर्वाधिक 66 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान तिच्या बॅटमधून आठ चौकार आणि एक षटकार आला.
Innings Break!
A brisk @EllysePerry FIFTY guides @RCBTweets to 135/6. 👍
Stay Tuned for the @mipaltan‘s chase! ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/QzNEzVGRhA#TATAWPL | #MIvRCB | #Eliminator pic.twitter.com/SpkGdkSZuM
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2024
या सामन्यात आरसीबीची सुरुवात खराब झाली. सलामी देण्यासाठी आलेल्या स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईन या संघाची धावसंख्या 20 असताना बाद झाल्या. आरसीबीने तीन चेंडूंत दोन विकेट गमावल्या. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर हेली मॅथ्यूजने सोफी डिव्हाईन हिला आपले बळी बनवले. तर तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नताली सिव्हर ब्रंटने कर्णधार स्मृती मानधना हिला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईन या प्रत्येकी 10 धावा काढून माघारी परतल्या.
याव्यतिरिक्त मुंबईविरुद्ध आरसीबीकडून दिशा कासट शून्य, ऋचा घोष 14 धावा, सोफी मोलिनक्स 11 धावा काढून बाद झाल्या. जॉर्जिया आणि श्रेयंका अनुक्रमे 18 आणि तीन धावा करून नाबाद राहिल्या.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ranji-trophy-2024-prize-money-money-rains-on-champion-mumbai-know-how-much-prize-money-was-received/
या सामन्यात मुंबईचे गोलंदाजी आक्रमण आरसीबीसाठी आपत्तीजनक ठरले. हेली मॅथ्यूज, नॅट सिव्हर ब्रंट आणि सायका इशाक यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.





