जुन्नर -जुन्नर तालुक्यात गुरुवारी 18 गावांत नव्याने 35 जणांचे करोनाअहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्येने 20 हजारांचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्ण संख्या ही 20 हजार 25 इतकी झाली आहे.
तर 18 हजार 884 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 643 रुग्णांचा मृत्यू झाला असून 498 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आळे, वडगाव कांदळी सर्वाधिक प्रत्येकी 4 रुग्ण आढळले असून, त्याखालोखाल वारुळवाडी,
जाधववाडी, वडज, राजुरीत प्रत्येकी 3, जुन्नर शयहर, नारायणगाव, येडगावात प्रत्येकी 2, माणिकडोह, धोलवड, हिवरे खुर्द, हिवरे तर्फे नारायणगाव, ओतूर, उंब्रज नं. 1, भटकळवाडी, कुरण व सावरगावात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.