Satara: जागतिक आदिवासी दिनाचे ९ ऑगष्टला सातारा येथे आयोजन
Satara आदिवासी बांधवांनी सातारा येथे एकत्र येऊन सातारा येथे आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Satara: सातारा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आदिवासी बांधवांनी दि. ९ ऑगस्ट रोजी सातारा येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात सातारा जिल्हात विविध क्षेत्रात कार्यरत असून दरवर्षी ते या कार्यक्रमाचे नियोजन करतात.
आदिवासी बांधवांनी सातारा येथे एकत्र येऊन सातारा येथे आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्याक्रमासाठी संतोष गेडाम हे प्रमुख वक्ते आहेत. जागतिक मुलवासी दिन साजरा करण्याचा उद्देश,जागतिक पातळीवरील एकता निर्माण भुमिका व समाजातील जागतिक आदिवासी दिनानिमित्त सद्यस्थिती या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत. या कार्याक्रमानिमित्ताने आदिवासी समाजाची संस्कृती व परंपरा याविषयी समाज जागृती करण्यात येणार आहे. पेसा क्षेत्र,अधिसंख्य पदामुळे आदिवासी समाजाची सदयस्थिती व पुढील वाटचालीसाठी यावेळी विचार मंथन करण्यात येणार आहे.
या कार्याक्रमानिमित्ताने माध्यमिक शालांत, उच्च माध्यमिक व पदवी,पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण,स्पर्धा परिक्षेत यशस्वी झालेल्या पाल्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व बांधवांनी सहकुटूंब या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्याक्रमासाठी मच्छिंद्र शेळके, राधेश्याम मडावी, संतोष गारे, रामभाऊ मोहंडुळे, यशवंत मुठे, शरद फलके, अशोक गिरंगे, विजय सुपे,श्री.झडे, दिलीप मुऱ्हे यांनी आयोजन केले आहे.





