Jambut News : पिंपरखेडमध्ये जागतिक फार्मासिस्ट व ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात
Jambut News : पिंपरखेड (ता. शिरूर) येथे बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन आणि ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विशेष प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Jambut News : विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव व समाजाप्रती जबाबदारीची भावना निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन श्री बाळेश्वर शैक्षणिक व कृषी विकास फाउंडेशन संचलित श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट, माळवाडी (बोटा) संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पोखरकर यांनी व्यक्त केले. (Jambut News)
यावेळी त्यांनी आपल्या संस्थेची ध्येय आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे बुधवार (दि. ७) रोजी पार पडलेल्या जागतिक फार्मासिस्ट दिन व ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्त ते बोलत होते. प्रसंगी सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. (Jambut News)
यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. केशव आरोटे, प्रा. लहू तांदळे, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संतोष वरे यांनी औषध निर्माण क्षेत्रावर आपापली मते मांडली. या कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांकडून पिंपरखेड गावातून हातात आरोग्य विषय विविध जनजागृतीचे पोस्टर्स व घोषवाक्याने फलक घेऊन जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी देखील सहभाग नोंदविला होता. (Jambut News)
यावेळी संस्थेकडून परिसरातील फार्मासिस्टांचा गौरव व ज्येष्ठांचा सन्मानदेखील करण्यात आला. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांकडून सुरक्षित औषधोपचार, औषधांचा योग्य वापर, स्वमेडिकेशनचे धोके, नियमित आरोग्य तपासणी आणि समाजातील फार्मासिस्टची भूमिका यावर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले. (Jambut News)
या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अमित पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. सागर सांगळे, प्राध्यापक स्वप्नील वरे, निशा वरे , मंगल शेळके आदींनी केले होते. (Jambut News)
यावेळी उपसरपंच विकास वरे, माजी उपसरपंच दामोधर दाभाडे, सोसायटीचे अध्यक्ष किरण ढोमे, लक्ष्मण गायकवाड, कैलासराव बोंबे, देवराम ढोमे, माऊली ढोमे, डॉ. पुरुषोत्तम रोह्क्ले, डॉ. राम पोखरकर, रमेश वरे, जेष्ठ फार्मासिस्ट संतोष आरोटे, विकास ठुबे, रुपाली ठुबे, शरद दाभाडे, योगेश बोंबे, सुरेखा दाभाडे, ऋतुजा वाळुंज, तनुजा रोकडे, दत्ता वरे, साक्षी वरे, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रांसाचालन नरेश ढोमे यांनी केले. विकास ठुबे यांनी आभार मानले. (Jambut News)





