ISSF World Jr. Shooting C’ship 2024 : भारतीय संघानं 50 मी. पिस्तूल स्पर्धेत साधला सुवर्णवेध, पदकतालिकेतही मारली बाजी….

World Junior Shooting C’ship 2024 : दीपक दलाल (545), कमलजीत (543) आणि राज चंद्र (528) यांच्या भारतीय संघाने पेरूची राजधानी लिमा येथे सुरू असलेल्या जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेच्या अंतिम दिवशी पुरुषांच्या 50 मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
भारतीय संघाने अंतिम फेरीत अझरबैजानचा एका गुणाने पराभव केला आणि एकूण 1616 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. आर्मेनियाचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. अशा प्रकारे भारताने पदकतालिकेत 13 सुवर्ण, तीन रौप्य आणि आठ कांस्य पदकांसह एकूण 24 पदकांसह चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान पटकावले. इटलीनं पाच सुवर्ण, चार रौप्य आणि चार कांस्य पदकांसह दुसरे तर नॉर्वेनं चार सुवर्ण पटकावताना एकूण 10 पदकांसह तिसरे स्थान पटकावले.
शेवटच्या दिवशीच्या इतर स्पर्धेत, शार्दुल विहान आणि साबिरा हॅरिस यांनी संयुक्तपणे ज्युनियर मिश्र सांघिक ट्रॅप स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिले. शार्दुल (71) आणि साबिरा (67) यांनी एकूण 138 गुण मिळवले. चेक रिपब्लिकने सुवर्णपदक तर इटलीने रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत झुहेर खान आणि भव्य त्रिपाठी या दुसऱ्या भारतीय जोडीने एकूण 134 गुणांसह संयुक्त सहावे स्थान मिळविले.
Results Update: Day 8 of Junior #Shooting Championships, Lima🇵🇪☑️👇🏻
* Deepak Dalal, Chandra Raj & Kamaljeet – Gold🥇
* Parisha Gupta – Silver 🥈
* Sejal, Ketan, & Kanishka Dagar –
Silver 🥈* Mukesh Nellavalli – Bronze🥉
* Shardul Vihan & Sabeera Haris – Bronze🥉… pic.twitter.com/JW972mRLSw
— SAI Media (@Media_SAI) October 7, 2024
मुकेश स्पर्धेतील सहावे पदक….
भारताच्या मुकेश नेलावल्लीने 50 मीटर पिस्तूल प्रकारात वैयक्तिक कांस्यपदक जिंकले, हे त्याचे स्पर्धेतील सहावे पदक आहे. त्याने 548 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. अझरबैजानच्या इम्रान गरयेवने ५५२ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या 50 मीटर पिस्तुलमध्ये परीषा गुप्ताने 540 गुणांसह वैयक्तिक रौप्यपदक जिंकले. हंगेरीच्या मिरियम जाकोने 546 गुणासह सुवर्णपदक मिळवले जो एक कनिष्ठ विश्वविक्रम आहे.
अन्य स्पर्धेत भारताच्या सेजल कांबळे (529), केतन (525) आणि कनिष्क डागर (513) यांनी सांघिक प्रकारात कांस्यपदक पटकावले. अझरबैजान संघाने सुवर्णपदक जिंकले.





