World Cup 2023 : पाकिस्तानला Semi Final गाठायची असेल तर करावा लागेल मोठा चमत्कार, जाणून घ्या…काय आहे समीकरण

World Cup 2023 Pakistan Semi Final Scenario : विश्वचषकाच्या 41व्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पाच विकेट राखून पराभव केला. स्पर्धेतील हा त्याचा पाचवा विजय असून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. साखळी फेरीतील त्याचे सर्व सामने पूर्ण झाले आहेत. न्यूझीलंडचे नऊ सामन्यांतून 10 गुण आहेत. त्यांनी पाच सामने जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत.
किवी संघ उपांत्य फेरीत पोहोचला तर मुंबईत भारताचा सामना होईल. आता अफगाणिस्तानचा संघ वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर पडला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी चमत्कारिक कामगिरी करावी लागणार आहे. न्यूझीलंडच्या श्रीलंकेवर मोठ्या विजयानंतर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे पूर्णपणे अशक्य झाले आहे.
पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे अशक्य…
पाकिस्तानचा पुढचा सामना इंग्लंडसोबत (PAK vs ENG) शनिवारी म्हणजेच 11 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. हा सामना पाक संघासाठी निर्णायक ठरणार आहे. न्यूझीलंडच्या श्रीलंकेवर मोठ्या विजयानंतर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे पूर्णपणे अशक्य झाले आहे. बाबर आझमच्या संघाला इंग्लंडविरुद्ध 287 धावांनी विजय मिळवावा लागेल. किंवा लक्ष्याचा पाठलाग केल्यास सामना 2.4 षटकांत संपवावा लागेल. हे करणे जवळजवळ अशक्य आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना या सामन्यात इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. या स्थितीत पाकिस्तानने 300 धावा केल्या तर त्यांना इंग्लंडला 13 धावाच्या आत गारद करावे लागेल.
Maharashtra Kesari 2023( माती विभाग) : सिंकदर शेख, संदीप मोटे यांच्यात रंगणार अंतिम लढत…
पाकिस्तानने विश्वचषकातील 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत, तर तेवढेच सामने गमावले आहेत. संघाचा निव्वळ धावगती सध्या +0.036 आहे, ज्यासह ते पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंडपेक्षा पाचव्या स्थानावर आहेत. पाकिस्तानने शेवटचा सामना जिंकला तर त्याचे न्यूझीलंडएवढेच 10 गुण होतील. पण, यास्थितीत ज्या संघाचा नेट रननेट अधिक असेल तो उपांत्य फेरीत आगेकूच करेल.





