Mohammed Shami : बॉलिवूडची अभिनेत्री मोहम्मद शमीवर झाली फिदा, उघडपणे दिला लग्नाचा प्रस्ताव,पण ठेवली एक विचित्र अट…

Mohammed Shami gets marriage proposal from Payal Ghosh : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये धमाकेदार कामगिरी करून सर्वांचेच लक्ष्य वेधून घेतले आहे. विरोधी संघांच्या फलंदाजांसाठी मोहम्मद शमी घातक ठरत आहे.
वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेसोबत झालेल्या सामन्यात शमीने 5 षटकात 18 धावा देत 5 विकेट घेतल्या. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमी चौथ्या क्रमांकावर आहे. पण विशेष बाब म्हणजे मोहम्मद शमीने फक्त 4 सामने खेळले आहेत, जे इतर आघाडीच्या गोलंदाजांच्या जवळपास निम्मे आहेत. मोहम्मद शमीने 4 सामन्यात 7 च्या सरासरीने 16 विरोधी फलंदाजांना आपले बळी बनवले आहे आणि त्याच्या याच धडाकेबाज कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत.
शमीची चर्चा केवळ क्रिकेट विश्वातच होत नाही, तर मनोरंजन, फिल्म विश्वातही त्याचे नाव चर्चेचा विषय आहे. एका बाॅलिवूड अभिनेत्रीने तर उघडपणे शमीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे. ही अभिनेत्री शमीची दुसरी पत्नी होण्यासाठीही तयार आहे पण तिने शमीसमोर एक विचित्र अट ठेवली आहे. आणि याबाबतची त्या अभिनेत्रीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
ठेवली एक विचित्र अट…
मोहम्मद शमीचा विश्वचषक स्पर्धेतील परफॉर्मन्स पाहून त्याच्यावर फिदा झालेली अभिनेत्री पायल घोष ही शमीची दुसरी बेगम बनण्यास तयार आहे. पायलने अलीकडेच शमीला लग्नासाठी प्रपोज करणारी एक पोस्ट ट्विटरवर शेअर केली होती, जी आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पायलने लिहिले होते की, “शम्मी, तू तुझे इंग्रजी सुधार, मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे.” यासोबतच तिने हास्याचे इमोजीही शेअर केले आहेत. पायलने शमीसमोर लग्नाचा प्रस्ताव तर ठेवला आहे पण क्रिकेटपटूने(मोहम्मद शमी) आधी त्याचे इंग्रजी सुधारावे अशी तिच्या ईच्छा (अट) आहे.
#Shami Tum apna English sudharlo, I’m ready to marry you 🤣🤣
— Payal Ghoshॐ (@iampayalghosh) November 2, 2023
दरम्यान, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषचे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.
त्याचवेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा विश्वचषकातही अप्रतिम प्रवास सुरूच आहे. भारतीय संघाने सलग 8 सामने जिंकून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. उपांत्य फेरी गाठणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. मात्र, भारतीय संघ 12 नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे.





