World Chess C’ship 2024 : विश्वविजेता डी. गुकेशचे मायदेशात दमदार स्वागत, पहा Chennai airport बाहेरील व्हिडीओ….

चेन्नई – जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी. गुकेशचे सोमवारी येथील विमानतळावर शेकडो उत्सुक चाहते, तामिळनाडू सरकार आणि राष्ट्रीय महासंघाच्या अधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. अठरा वर्षांच्या गुकेशने गेल्या आठवड्यात सिंगापूरमध्ये चीनच्या डिंग लिरेनचा ७.५-६.५ असा पराभव करून सर्वात तरुण विश्वविजेता बनला आणि रशियाच्या गॅरी कास्पारोव्हचा दीर्घकालीन विक्रम मोडला.
मायदेशात परतल्यानंतर गुकेशने पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. युवा खेळाडूला जवळून पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
The moment when World Chess Champion @DGukesh came out of the Chennai airport and received a rousing reception! #GukeshDommaraju pic.twitter.com/TYmNkYloKU
— ChessBase India (@ChessbaseIndia) December 16, 2024
यावेळी बोलताना गुकेश म्हणाला, “हे विलक्षण आहे. तुमच्या पाठिंब्याने मला खूप ऊर्जा मिळाली. विश्व चॅम्पियनशिप जिंकणे ही एक मोठी भावना आहे.” विश्वनाथन आनंदनंतर विश्वविजेतेपद पटकावणारा गुकेश हा दुसरा भारतीय आहे.
VIDEO | World chess champion D Gukesh felicitated at an event organised by Velammal Nexus, the school he studied in during childhood, in Chennai. #GukeshWorldChampion pic.twitter.com/YmQ3HKPtyn
— Press Trust of India (@PTI_News) December 16, 2024
आनंदने येथील त्याच्या अकादमीत किशोरवयीन मुलांचा खेळ सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गुकेशने वेलमल स्कूलमधून बुद्धिबळाचा प्रवास सुरू केला.
चाहत्यांना अभिवादन केल्यानंतर गुकेश फुलांनी सजवलेल्या कारमधून आणि त्याचे छायाचित्र घेऊन घराकडे रवाना झाला. आईवडील, नातेवाईक आणि मित्रांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी घरी परतण्यापूर्वी तो मोगप्पैर येथील वेलाम्मल शाळेत तो भेट देण्यासाठी गेला होता.





