Women’s T20 World Cup 2024 : टी- 20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, कर्णधारपदात मोठा बदल…

Pakistan Women squad for T20 World Cup 2024 : तीन ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आयसीसी महिला टी -20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाने अनुभवी निदा दार ऐवजी 22 वर्षीय फातिमा सनाची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. अष्टपैलू असणाऱ्या फातिमाने 41 एकदिवसीय आणि 40 टी-20 सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व केले आहे.
Unofficial Test (AUS A vs IND A) : टी-20 आणि वनडे मालिकेनंतर टीम इंडियाचा एकमेव कसोटीतही पराभव….
यापूर्वी तिने पाकिस्तानच्या देशांतर्गत संघाचे देखील नेतृत्व केले आहे. डिसेंबर 2023 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या एकदिवसीय लढतीत फातिमाने संघाचे नेतृत्व केले होते. विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान संघ अ गटात असून या गटात ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंका हे संघ असणार आहेत.
.@imfatimasana named Pakistan captain for ICC Women’s T20 World Cup 2024 🚨
Our squad for the marquee event 🇵🇰#BackOurGirls pic.twitter.com/NWoF6RmyVH
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 25, 2024
पाकिस्तानचा संघ : फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली (यष्टीरक्षक), नशरा सुंधू, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल (फिटनेसच्या अधीन), सिद्रा अमीन, सय्यदा आरूब शाह, तस्मिया रुबाब आणि तुबा हसन राखीव: नजिहा अल्वी (यष्टीरक्षक); गैर-प्रवास राखीव जागा: रामीन शमीम आणि उम्म-ए-हानी.





