Unofficial Test (AUS A vs IND A) Result : टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारत अ महिला संघाला एकमेव अनधिकृत कसोटीतही ऑस्ट्रेलिया अ संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. टेस फ्लिंटॉफ (39 धावांत 3 विकेट) आणि चार्ली नॉट (34 धावांत 3 बळी) यांच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया अ संघाने रविवारी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या अनधिकृत महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारत अ संघाचा 45 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 212 धावा आणि दुसऱ्या डावात 260 धावा केल्या होत्या. भारतीय संघाने पहिल्या डावात 184 धावा तर दुसऱ्या डावात 243 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 289 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाचा दुसरा डाव हा 92.5 ओव्हरमध्ये 243 धावांवर आटोपला. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 6 विकेट्स गमावून 68 ओव्हरमध्ये 149 धावा केल्या होत्या. त्यामुळे चौथ्या आणि अखेरच्या दिवशी विजयासाठी आणखी 140 धावांची गरज होती. तर ऑस्ट्रेलियाला 4 विकेट्स हव्या होत्या. मात्र टीम इंडियाच्या उर्वरित फलंदाजांना चौथ्या दिवशी 4 विकेट्स गमावून 94 धावाच करता आल्या.
कालच्या 6 बाद 149 धावसंख्येवरून पुढे उमा छेत्री आणि राघवी बिश्त यांनी डावाची धुरा सांभाळत 7व्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी करून सामना रोमांचक केला. 210 च्या धावसंख्येवर भारतीय महिला अ संघाला 7वा धक्का उमा छेत्रीच्या रूपाने बसला, जी 80 चेंडूत 47 धावांची खेळी करण्यात यशस्वी ठरली. ही भागीदारी मोडून ऑस्ट्रेलिया महिला अ संघाने सामन्यात पूर्ण पुनरागमन केले आणि 212 धावांवर राघवी बिश्तच्या रूपाने भारतीय संघाला 8वा धक्का दिला. तीने 102 चेंडूंचा सामना केल्यानंतर 26 धावा केल्या. आॅस्ट्रेलियाच्या फ्लिंटॉफने राघवी आणि उमा या दोन्ही खेळाडूंना बाद केले. यानंतर 219 धावांवर मन्नत कश्यपच्या रूपाने नववा धक्का बसला. सायली सातघरे हिने प्रिया मिश्राच्या साथीने धावसंख्या 243 धावांपर्यंत नेली पण तिला या सामन्यात संघाला 45 धावांच्या पराभवापासून वाचवता आले नाही.
अष्टपैलू सायली सातघरेने 36 चेंडूत 21 धावा केल्या मात्र त्या विजयासाठी पुरेशा ठरल्या नाहीत. दरम्यान, टीम इंडियाकडून दुसर्या डावात विकेटकीपर उमा चेत्री हीने सर्वाधिक धावा केल्या. उमाने 80 बॉलमध्ये 47 रन्स केल्या तर शुभा सतीशने 45 धावा , सलामीवीर प्रिया पुनियाने 36, श्वेता सेहरावत 21 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन मिन्नू मणी हिला फक्त 10 धावा करता आल्या.
Australia A women completes another win, beating India A by 45 Runs on Day 4.
1st innings
• Australia A – 212/10 (65.5)
Georgia Voll – 71(95)
Minnu Mani – 5/58 (21)• India A – 184/10 (73.1)
Shweta Sehrawat – 40(120)
Kate Peterson – 5/16 (12)2nd innings
•Australia A -… pic.twitter.com/Je59Nckilu— Female Cricket (@imfemalecricket) August 25, 2024
ऑस्ट्रेलियाकडून चार्ली नॉट आणि टेस फ्लिंटॉफ या दोघींनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. ग्रेस पार्सन्स हीने दोन बळी घेतले तर लिली मिल्स आणि मॅटलान ब्राउन या दोघींनी 1-1 विकेट घेतली.
ENG vs SL 1st Test : जो रूटचे विक्रमी अर्धशतक, राहुल द्रविड आणि ॲलन बॉर्डरला टाकले मागे…
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निराशाजनक कामगिरी…
दरम्यान टीम इंडियाची संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निराशाजनक कामगिरी राहिली. टीम इंडियाला टी 20 मालिकेत 0-3 अशा फरकाने तर एकदिवसीय मालिकेत 2-1 अशा फरकाने अपयशाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने एकमेव अनधिकृत कसोटी सामनाही जिंकला आहे. टीम इंडियाला हा कसोटी सामना जिंकून शेवट गोड करण्याची संधी होती, मात्र त्यातही ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने बाजी मारली.