Women’s T20 World Cup 2024 : सलग चौथ्या विजयासह ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत…! हरमनप्रीतची अर्धशतकी खेळी व्यर्थ, भारत 9 धावांनी पराभूत…

Women’s T20 World Cup 2024 (IND vs AUS Score Update) : महिला टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महत्त्वाचा सामना पार पडला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताचा 9 धावांनी पराभव केला. या विजयासह त्यांनी महिला टी20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरी गाठण्याच्या दृष्टिकोनातून हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा होता. टीम इंडिया अजूनही शर्यतीत आहे, पण उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना इतर संघांवर (न्यूझीलंड आणि पाकिस्तान) अवलंबून राहावे लागणार आहे.
A valiant knock from Captain Harmanpreet Kaur 👏👏#TeamIndia came close to the target but it’s Australia who win the match by 9 runs in Sharjah.
📸: ICC
Scorecard ▶️ https://t.co/Nbe57MXNuQ#T20WorldCup | #INDvAUS | #WomenInBlue pic.twitter.com/jBJJhjSzae
— BCCI Women (@BCCIWomen) October 13, 2024
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 151 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला 20 षटकात 9 बाद केवळ 142 धावा करता आल्या. भारताकडून हरमनप्रीत कौरने नाबाद अर्धशतक झळकावले. तिने 47 चेंंडूत 6 चौकाराच्या मदतीनं 54 धावा केल्या. मात्र, तरीही टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही. हरमनप्रीत कौरने 44 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तिचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 14 वे अर्धशतक ठरले. आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत ॲनाबेल सदरलँड आणि सोफी मोलिनेक्सने प्रत्येकी दोन गडी बाद महत्वपूर्ण कामगिरी बजावली. तर मेगन शुट्ट आणि एशले गार्डनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
याव्यतिरिक्त भारताकडून फलंदाजीत दीप्ती शर्मा 25 चेंडूत तीन चौकारासह 29 धावा करून तर शफाली वर्मा 13 चेंडूत (2 चौकार आणि 1 षटकार) 20 धावा करून बाद झाली. जेमिमाह रॉड्रिग्ज 12 चेंडूत तीन चौकारासह 16 धावा करून बाद झाली. याव्यतिरिक्त पूजा वस्त्राकर 9, स्मृती मानधना 6 धावा, ऋचा घोष 1 धाव काढून तर अरुंधती रेड्डी,श्रेयंका पाटील आणि राधा यादव शून्यावर बाद झाल्या.
तत्पूर्वी, महत्तपूर्ण लढतीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 8 गडी गमावून 151 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीत ग्रेस हॅरिसने 41 चेंडूत 5 चौकारासह 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कर्णधार ताहलिया मॅकग्राने 26 चेंडूत 4 चौकारासह 32 धावांची तर एलिस पेरीने 23 चेंडूत 2 चौकार अन् 1 षटकाराच्या मदतीने 32 धावांचे योगदान दिले.
Innings Break!
Australia post 151/8 in the first innings.#TeamIndia chase coming up, over to our batters 🙌
📸: ICC
Scorecard ▶️ https://t.co/Nbe57MXNuQ#T20WorldCup | #INDvAUS | #WomenInBlue pic.twitter.com/hd6unzMWNC
— BCCI Women (@BCCIWomen) October 13, 2024
भारताकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्मा आणि रेणुका सिंगने प्रत्येकी 2 बळी घेतले. दीप्तीने 4 षटकात 28 तर रेणूकानं 4 षटकात 24 धावा दिल्या. श्रेण्यका पाटील(4 षटकात 32 धावा), पूजा वस्त्राकर(3 षटकात 22 धावा) आणि राधा यादव (2 षटकात 14 धावा) यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.





