Men’s T20 Emerging Teams Asia Cup 2024 : भारतीय क्रिकेट संघ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त असतानाच आता 18 ऑक्टोबरपासून टी20 इमर्जिंग टीम आशिया कप 2024 स्पर्धा सुरु होत आहे. ओमान या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार असून बीसीसीआयनं (BCCI) त्यासाठी भारतीय ‘अ’ संघाची घोषणा केली आहे.
भारतीय युवा संघाची कमान तिलक वर्मा याच्याकडे सोपवण्यात आली असून या संघात एकापेक्षा एक तुफानी खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे, जे टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज असतील.
इमर्जिंग आशिया चषक 2024 साठी निवडलेल्या भारतीय संघात काही कॅप्ड खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये संघाचा कर्णधार तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, आर साई किशोर आणि राहुल चहर यांच्या नावांचा समावेश आहे. या संघात समाविष्ट असलेला राहुल चहर हा भारताच्या विश्वचषक संघाचा भाग होता. अशा स्थितीत त्याचा अनुभव भारतीय संघासाठी उपयुक्त ठरणार आहे.
इमर्जिंग एशिया कप 2024 मध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत भारतासह बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांचेही ‘अ’ संघ सहभागी होणार आहेत. तसेच युएई, ओमान आणि हाँग काँग या संघांचे प्रमुख राष्ट्रीय संघ सहभागी होणार आहेत. ज्यांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. अ-गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग आणि श्रीलंका तर ब-गटात भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि यूएईमध्ये यांचा समावेश आहे. या दोन्ही ग्रुपमधून साखळी फेरीनंतर प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्यफेरीमध्ये प्रवेश करतील.
18 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. जिथे पहिला सामना बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात होणार आहे. त्याचवेळी भारत 19 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया 21 ऑक्टोबरला युएई (UAE) आणि 23 ऑक्टोबरला यजमान राष्ट्र ओमानविरुद्ध सामने खेळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 27 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. त्याआधी 25 ऑक्टोबर रोजी दोन्ही उपांत्यफेरीचे सामने होतील. भारताचे सर्व सामने संध्याकाळी 7 वाजता होतील.
The squad list is out for India A, led by Tilak Varma as the captain! 🇮🇳#ACC #MensT20EmergingTeamsAsiaCup pic.twitter.com/XAWOm4DDM5
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) October 12, 2024
इमर्जिंग एशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ – तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, अनुज रावत, प्रभसिमरन सिंग, आयुष बडोनी, निशांत सिंधू, नेहल वढेरा, रमणदीप सिंग, आकिब खान, अंशुल कंबोज, वैभव अरोरा, हृतिक शौकीन, आर साई किशोर, राहुल चहर, रसिक सलाम.