Women’s Asia Cup 2024 (Final) : मंधानाचे अर्धशतक, भारताचे श्रीलंकेसमोर 166 धावांचे लक्ष्य…

Live Cricket Score (IND-W vs SL-W) Final T20 Asia Cup 2024 : भारताने आतापर्यंत सातवेळा आशियाई करंडक स्पर्धा जिंकली आहे. यंदा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाचा आठव्यांदा विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न असेल. तर, स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या श्रीलंकेचा घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवून इतिहास रचण्याचा प्रयत्न असेल.
महिला आशिया कप 2024 चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जात आहे. विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघांची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 165 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. अशाप्रकारे श्रीलंकेला प्रथमच आशिया कप चॅम्पियन बनण्यासाठी आता 166 धावांची गरज आहे.
India set a target of 166! 🏏 Time for our Lionesses to roar and chase this down! Let’s bring home the win! 🇱🇰 💪#GoLionesses #WomensAsiaCup2024 pic.twitter.com/6rqo3JdBEl
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 28, 2024
भारतासाठी स्मृतीने 47 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली, मात्र इतर भारतीय फलंदाज उमा छेत्री (09), हरमनप्रीत कौर (11) आणि शेफाली वर्मा (16) यांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. याव्यतिरिक्त जेमिमाह रॉड्रिग्जनंतर रिचा घोषने अखेरच्या षटकांमध्ये शानदार खेळी केली. जेमिमाह रॉड्रिग्जने 16 चेंडूत 29 धावा तर रिचा घोषने 14 चेंडूत 30 धावा करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
श्रीलंकेकडून कविशा दिलहरीने सर्वाधिक 2 बळी घेतले. याशिवाय उदेशिका प्रबोधनी, सचिन निशांक आणि चमारी अट्टापथू यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.





