नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत मार्शल्सकरवी सभागृहात महिला खासदारांना जी मारहाण व धक्काबुक्की झाली त्याचा अनुभव आज पत्रकार परिषदेत कथन करताना कॉंग्रेसच्या दोन महिला राज्यसभा सदस्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी रडत जी कहाणी कथन केली त्यातून पत्रकार परिषदेचे वातावरण गंभीर बनले होते.
कॉंग्रेसने महिला राज्यसभा सदस्यांना सरकारने मार्शल्स करवी कशी वागणूक दिली याची माहिती पत्रकारांना नव्याने करून देताना आपल्या पक्षाच्या दोन महिला खासदारांनाच त्यांचे अनुभव कथन करण्यासाठी पाचारण केले होते. त्यावेळी खासदार छाया वर्मा आणि खासदार फुलो देवी नेतम यांनी भरल्या डोळ्याने ही सारी कहाणी पुन्हा कथन केली.
11 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमाराला सरकारने एक घटना दुरुस्ती विधेयक बळाच्या जोरावर संमत करून घेतले. त्याला विरोध करताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात जोरदार हंगामा केला. त्यांना रोखण्यासाठी सभागृहात मार्शल्स बोलावले गेले.
#WATCH | Raipur, Chhattisgarh: Congress Rajya Sabha MPs Chhaya Verma & Phulo Devi Netam break down while addressing the media on August 11 ruckus in the House pic.twitter.com/mHFp0MUrFq
— ANI (@ANI) August 18, 2021
त्यांनी आम्हाला धक्का देऊन खाली पाडले असा आरोप या दोघींनी करून मार्शल्सनी दिलेल्या वागणुकीचा सारा इतिहास कथन केला. त्यावेळी त्या आठवणींना उजाळा देताना त्यांना रडू कोसळले.