Supreme Court : नावे वगळलेल्या मतदारांच्या अपिलांना प्राधान्य द्या; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेतून ज्या मतदारांची नावे वगळल्यात आली आहेत आणि विशेषतः ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Supreme Court) नियोजित आहेत, त्यांना अपिलांना प्राधान्य देण्यात यावे.

Supreme Court : पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेतून ज्या मतदारांची नावे वगळल्यात आली आहेत आणि विशेषतः ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Supreme Court) नियोजित आहेत, त्यांना अपिलांना प्राधान्य देण्यात यावे.
या याचिकांचा जलदगतीने आणि पारदर्शक पद्धतीने निपटारा करण्यासाठी पावले उचलावित. या अपीलांवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधिकरणांची संख्या वाढवावी, असे महत्त्वाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले.
ही सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जॉयमाल्य बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर पार पडली. या सुनावणीत खंडपीठाने पश्चिम बंगालमधील कथित एसआयआर प्रक्रियेतील गोंधळाची गंभीर दखल घेत न्यायाधिकरणांना अपीलांचे दोन श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी युक्तीवाद केला.
खंडपीठाने नमूद केले की, निवडणूक आयोगाने कोलकात्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत करून राज्यातील अपील न्यायाधिकरणांची संख्या वाढवावी, जेणेकरून प्रलंबित असलेली अपीले लवकर निकाली काढता येतील. तसेच कोलकाता महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मतदारांशी संबंधित अपीलांना प्राधान्य दिले जावे, असेही न्यायालयाने नमूद केले.
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी युक्तीवाद खंडपीठाला सांगितले की, सुमारे ३८ लाख अपील दाखल झाली असून, त्यापैकी केवळ एक लाख अपीलांचा निपटारा करण्यात आला आहे. विशेषतः मोठ्या संख्येने प्रलंबित असलेल्या अपीलांच्या (Supreme Court) पार्श्वभूमीवर, या आकडेवारीवरून जलदगतीने न्यायनिवाडा करण्याची गरज दिसून येते. कोलकाता महापालिका क्षेत्रातील दोन लाखांहून अधिक मतदारांना कथितरित्या मतदार यादीतून वगळण्यात आले असून, त्यांची अपील प्रलंबित आहेत.






